लसीकरणातही राजकारण करणार का? काँग्रेसच्या आमदाराचा शिवसेनेविरुद्ध संताप

Ram Kadam - Maharashtra Today

मुंबई : कोरोना प्रतिबंधक लसीकरणावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर कुरघोडीचे राजकारण करत आहेत. दरम्यान, काँग्रेस आमदाराने शिवसेनेला ‘आता लसीकरणावरही राजकारण करणार का?’ असा सवाल केला आहे. यामुळे राज्यातील महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारमध्ये काँग्रेस (Congress) आणि शिवसेना (Shivsena) यांच्यातील वाद पुन्हा उफाळला आहे.

काँग्रेसचे वांद्रे येथील आमदार झिशान सिद्धिकी यांनी ट्विटरवरून शिवसेनेचे मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यवर टीका केली – वांद्रे पूर्व मतदारसंघात शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांच्या हस्ते कोविड लसीकरण केंद्राचे उद्धाटन करण्यात आले. मी या मतदारसंघाचा आमदार आहे. तरीही प्रोटोकॉलनुसार मला या कार्यक्रमाला निमंत्रित केले नाही. आता शिवसेना लसीकरणावरही राजकारणा खेळणार आहे का?

झिशान सिद्धिकी यांच्या या आरोपानंतर भाजपा आणि मनसेनेही ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले. भाजपा आमदार राम कदम म्हणाले की, आम्ही नाही तर महाराष्ट्र सरकारमध्ये भागीदारी असलेले काँग्रस पक्षाचे नेते सांगत आहेत. ठाकरे सरकार लसीकरणावरही राजकारण करत आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेने काँग्रेसला कसे लाचार बनवले आहे हे राहुल गांधींनी बघावे. तुमचा पक्ष सर्वांसमोर अपमानित होतो आहे. काय दिवस आलेत?

मनसेचे अखिल चित्रे म्हणाले की, मी अशा मतदारसंघात आहे जिथे दोन पक्ष एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढलेत नंतर महाविकास आघाडीत सोबत आलेत. मात्र सोबत येऊन सुद्धा आता मतदारसंघात दोघे एकमेकांना काम करू देत नाहीत, अशी रडारड सुरू आहे. या मतदारसंघाचे दुर्दैव आहे.

वांद्रे पूर्व मतदारसंघात जिथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मातोश्री निवासस्थान येते. या मतदारसंघात मागच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी दिली होती. शिवसेनेच्या तृप्ती सावंत यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली. यात मतांची विभागणी होऊन काँग्रेसचे झिशान सिद्धिकी निवडणुकीत जिंकले.

Disclaimer:-बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button