मोदी-ठाकरेंमध्ये वैयक्तिक भेट होणार? दिल्लीत राजकीय चर्चेला उधाण

PM Modi,Uddhav Thackeray

मुंबई : मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज त्यांच्या शिष्टमंडळासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेत आहे . या भेटीनंतर मुख्यमंत्री पंतप्रधान मोदी यांची वैयक्तिक भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे . त्यामुळे दिल्लीत राजकीय चर्चा रंगल्या आहेत .

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, बांधकाम मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण आणि राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे हे पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत.
राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगला पेटला आहे .

त्यामुळे मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री पंतप्रधान मोदींची भेट घेत आहे .या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांना वैयक्तिकरित्या १० मिनिटांसाठी पंतप्रधान मोदींना भेटायचं आहे.

दरम्यान शिवसेना आणि भाजप यांच्यात बरेच वर्ष युती होती. मंत्री २०१९ मध्ये वाद होऊन शिवसेना युतीतून बाहेर पडली. शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत सरकार स्थापन केले  हे विशेष .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button