लॉकडाऊन होणार का? राजेश टोपेंचे महत्त्वाचे विधान

Rajesh Tope

मुंबई :- वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन होणार का? असा सवाल प्रत्येक नागरिकाच्या मनात आहे. याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी भाष्य केले आहे. राजेश टोपे म्हणाले की, “अद्याप लॉकडाऊनबाबत निर्णय झालेला नाही. यावर चर्चा सुरू आहे. कडक निर्बंधांबाबत शासन पाऊल उचलेल. लोकांनी गर्दी टाळावी हा दृष्टिकोन आहे. गर्दी होणाऱ्या ठिकाणी कडक निर्बंध लावले जाणार आहेत.”

औरंगाबामध्ये काल झालेल्या गर्दीबाबत टोपे म्हणाले की, “अशी गर्दी करणे हे परवडणार नाही. या प्रकारची गर्दी होता कामा नये. खासदार इम्तियाज जलील याचे  भान ठेवतील, अशी अपेक्षा आहे.”

शरद पवार (Sharad Pawar) यांच्या तब्येतीबाबत टोपे म्हणाले की, “शरद पवार यांना पोटात दुखत असल्यामुळे रुग्णालयात दाखल केले आहे. पोट दुखण्याचे कारण पित्तनलिकेच्या मुखाशी खडा निर्माण झाला होता. त्यामुळे त्रास होत होता. एंडोस्कोपीने तो खडा काढला आहे. अजून एक शस्त्रक्रिया करायची आहे. मात्र, आता ते स्टेबल असल्याने त्यांना ३-४ दिवसांत डिस्चार्ज होईल.”

कोरोनाबाधितांची संख्या मागील काही दिवसांपासून सातत्याने वाढत आहे. मंगळवारी कोरोना मृत्यूची संख्या काहीशी वाढलेली दिसली. त्यामुळे प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांत अडचणी वाढल्या आहेत. रविवार आणि सोमवारच्या तुलनेत महाराष्ट्रात मंगळवारी नव्या कोरोनाबाधितांचा आकडा काहीसा कमी दिसून आला. पण, २७ हजार ९१८ इतकी नव्या बाधितांची नोंद आहे. मंगळवारी कोरोनामुळे १३९ जणांचा मृत्यू झाला.

ही बातमी पण वाचा : शरद पवारांवर आणखी एक शस्त्रक्रिया होणार, राजेश टोपेंची माहिती

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button