ज्या रेमडेसीवर भोवती राजकारण तापलंय ते करोनाग्रस्तांचे प्राण वाचवेल का?

Maharashtra Today

रेमडेसीवर या औषधाला कोरोना (Corona) काळात प्रचंड महत्त्वा प्राप्त झालंय. रुग्णांचा जीव वाचवण्याचा एकमेव उपाय म्हणून याकडं पाहिलं जातंय. रुग्णांची झपाट्यानं वाढणारी संख्या आणि त्यामुळं रेमडेसीवरवर अचानक पडलेला ताण यामुळं औषधांच्या पुरवठ्यात तुट निर्माण झाली. या परिस्थीतीचा फायदा घेत रेमडेसीवर औषधाची मुंबई (Mumbai) आणि पुण्यासह राज्यातल्या महत्त्वाच्या शहरांमध्ये अव्वाच्या सव्वा भावानं विक्री सुरुये; राज्याच्या राजकारणात सुद्धा या ‘रेमडेसिवीर’ (Remedesivir) या नावामुळं भुकंप निर्माण झालाय. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमुळे टोकाची लढत यात पहायला मिळते. कोरोनाग्रस्त रुग्णांचा जीव वाचावा म्हणून रेमडेसिवीर खरंच उपयोगी पडते का? हे पाहणं गरजेचं आहे.

रेमडेसिवीर जादूची कांडी नाही.

वैद्यकीय तज्ञांच्या मतांचा आधार घेऊन सांगायचं तर, रेमडेसिवीर औषध घेतल्यामुळं रुग्णांचा जीव वाचतो याचा कुठलाच पुरावा उपलब्ध नाही. शिवाय कोरोनाची दुसरी लाट त्सुनामीत बदलली आहे. आरोग्य सेवांना फज्जा उडाला आहे. बेड्स, ऑक्सीजन, व्हेंटीलेटर आणि आय. सी. यु. साठी रुग्णांच्या नातेवाईकांची प्रचंड धावपळ होत असताना रेमडेसिवीरसाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागतो.

एकीकडे बेड्सचा प्रश्न गंभीर बनलाय तर दुसऱ्या बाजूला रेमडेसिवीरसाठी मोठा संघर्ष करावा लागतोय; पण या परिस्थीतीत रेमडेसिवीर खरंच गुणाकारी आहे का? हे पाहणं महत्त्वाचं ठरतं. ‘इबोला’ रोगाचा प्रसार जेव्हा झाला तेव्हा त्याच्यावर रेमडेसिवीर वापरण्यात आलं. रेमडेसिवीरचा गैरवापर होऊ नये म्हणून ‘इंडीयन मेडीकल असोसिएशन’नं पत्रकार रिषद घेतली आणि त्यासंबंधी बऱ्याच गोष्टी प्रकाशात आणल्यात. यात स्पष्ट करण्यात आलं की ‘रेमडेसिवीर औषधांमुळं रुग्णांचा दवाखन्यातला वेळ वाचवता येतो. त्यांना दवाखान्यात उपाचारासाठी लागणाऱ्या दिवसांमध्ये घट होते. रिकव्हरी ही लवकर होते.’

कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर रुग्णांना रेमडेसिवीर देण्यात येतं. ज्यांना ऑक्सीजन लावण्यात आलाय फक्त त्यांच्यासाठी हे औषध उपयुक्त ठरु शकतं असं ही तज्ञ डॉक्टर सांगतात. रुग्णालयात ऑक्सीजन अभावी उपचार घेणाऱ्यांना रेमडेसिवीरची गरज नसल्याचं ही डॉक्टर म्हणायेत. गोंधळून जाऊन रुग्णांच्या नातेवाईकांनी उगाच रेमडेसिवीरसाठी धावपळ करु नये असं बोललं जातंय. रेमडेसिवीर म्हणजे ‘अलादिनचा चिराग’ नसल्याचं वैद्यकीय क्षेत्रातले जाणकार सांगतात.

का निर्माण झाला संभ्रम?

कोरोनाची दुसरी लाट असं आक्राळ विक्राळ रुप घेईल याचा अंदाज कुणालाच नव्हता. या लाटेचा सामना करण्यासाठी आपण तयार नव्हतो. त्यामुळं लोकांना या आरोग्य आणीबाणीला तोंड देताना मोठ्या भितीला सामोरं जावं लागतंय. अनेक गैरसमजुती पसरायला असा अस्थिर काळ पोषक असतो त्यामुळं अशा प्रकारच्या गैरसमजुती सहज पसरतात. शिवाय कोरोनाची तिसरी आणि चौथी लाट येण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.

राजकारण तापलं

दरम्यान राज्यात रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण झाला होता. यात दमण इथल्या ब्रुक फार्मा कंपनीकडं ६० हजार रेमडेसिवीरचा साठा असल्याची बातमी प्रसिद्ध झाली. यानंतर कंपनीचे मालक राजेश डोकानिया यांना अटक झाली होती. त्यांच्यासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पोलिस स्टेशनला गेले होते.

यावर प्रतिक्रिया आल्या. देवेंद्र फडणवीस पोलिसांवर दबाव टाकत असल्याचं बोललं गेलं. राज्याचे नवे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Vadase Patil) आणि देवेंद्र फडणवीस एकमेकांसमोर आल्याचं दिसलं. वळसे पाटलांना उत्तर देताना फडणवीस म्हणाले, “या प्रकरणी गृहमंत्र्यांना माझी चौकशी करायची असेल किंवा कारवाई करायची असेल तर त्यांनी खुशाल करावी. मी कारवाईच्या इशाऱ्यांना घाबरत नाही. राज्यातील जनतेच्या हितासाठी मी गेले २० वर्षे विरोधी पक्षाच्या माध्यमातून आवाज उठवतोय. या राजकारणाच्या दरम्यान ३६ केसेस माझ्या अंगावर घेतल्या आहेत. आणखी काही केसेस लागल्या तरी हरकत नाही.”

राज्यात आरोग्य आणीबाणी असताना राजकारण तापल्याचं दिसतंय. अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केंद्रावर आरोप केलेत की महाराष्ट्राला रेमडेसिवीर मिळू नये म्हणून केंद्र कंपन्यांवर दबाव टाकतंय. यावर दरेकरांनी आव्हान दिलं होतं की आरोप सिद्ध करा अथवा राजीनामा द्या. नंतर नवाब मलिक यांच्याकडून कोणतंच स्पष्टीकरण आलेलं नाही. रेमडेसिवीरचा विषय फक्त कोरोनाग्रस्तांसाठी मर्यादित न राहता राज्याच्या राजकारणातला महत्त्वाचा भाग बनलंय

Disclaimer : ‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button