राजकीय समीकरण बदलणार? प्रकाश आंबेडकरांच्या भेटीनंतर संभाजीराजेंचे सूचक विधान

Prakash Ambedkar - Maharashtra Today

पुणे : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून खासदार संभाजीराजे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवातही केली आहे. त्याचाच भाग म्हणून संभाजीराजे यांनी आज पुण्यात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना संभाजीराजे यांनी अत्यंत सूचक विधान केले. बऱ्याच दिवसांपासून प्रकाश आंबेडकर यांची भेट घ्यायची होती. मला शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा आहे. शाहू महाराज आणि डॉ. आंबेडकर एकत्र येऊ शकतात, तर मी आणि प्रकाश आंबेडकर का एकत्र येऊ शकत नाहीत? हा भेटीमागचा हेतू होता, असं म्हणत संभाजीराजे यांनी राज्यातील राजकीय समीकरण बदलण्याविषयीचे संकेत दिले आहे.

संभाजीराजे छत्रपती आणि प्रकाश आंबेडकर यांची आज पुण्यात बैठक पार पडल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मागील अनेक दिवसांपासून प्रकाश आंबेडकर यांना भेटण्याची इच्छा होती. भेट घेण्यामागे जातीय विषमता कमी करता येईल, बहुजन समाज एका छताखाली राहील, हे कारण आहे. त्याचबरोबर मराठा आरक्षण हा एक भेटीचा भाग होईल. शाहू महाराज यांनी सुरुवातीला बहुजन समाजाला आरक्षण दिलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचीही मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी इच्छा होती, असंही संभाजीराजे यांनी यावेळी आवर्जून सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button