१ जूनपासून लॉकडाऊन शिथिल होणार का? आदित्य ठाकरेंनी दिले संकेत

Aditya Thackeray

मुंबई :- कोरोनाचा (Corona Virus) वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्रात १ जूनपर्यंत लॉकडाऊनचा (Corona Lockdown) निर्णय घेण्यात आला होता. आता हा लॉकडाऊन १ जूनपासून शिथील करणार की वाढवण्यात येणार याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे. मात्र लगेचच सर्व काही उघडणार नाही, असं सूचक विधान पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केले आहे. लॉकडाऊन आपल्याला हळूहळू उघडावे लागेल. कोरोना स्थिती पाहून निर्णय होईल. लसीचा जसा पुरवठा होतो तसं लसीकरण आपण करतोय. चिंतेत राहू नका, गर्दी करू नका, असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी केलं.

आमच्यासाठी लोकांचे जीव महत्त्वाचे आहेत. मागच्यावेळी लॉकडाऊन हटवल्यानंतर कोरोना रूग्णांची संख्या अचानक वाढली. आता आकडे कमी येत असले तरी लगेचच सर्व काही सुरु होणार नाही. मुंबईतील दैनंदिन कोरोना रूग्णांची संख्या नियंत्रणात आली असली तरी आम्ही ते शून्यावर कसे आणता येईल याकडे लक्षदेत आहोत. अजूनही १३०० ते १४०० केसेस आहेत त्यामुळे त्या केसेस पूर्ण कमी करण्याकडे आमचं लक्ष आहे, असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं.

महाराष्ट्रात लसीकरण मोठ्या प्रमाणात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वय आहे. प्रत्येक राज्याची मागणी आहे की, आम्हाला जास्तीत जास्त लस द्या, तशी आमचीही आहे पण जसजशी लस उपलब्ध होतेय तसं लसीकरण केलं जातं आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत सगळ्यात जास्त लसीकरण झाले आहे. काही गावे तर अशी आहेत की पूर्णपणे लसीकरण झालेले आहे. संभाजीनगर परिसरात अशी दोन गावे आहेत.

मुंबईत २२७ लसीकरण केंद्रावर लसीकरण मोहीम राबवली जात आहे. ड्राईव्ह इन लसीकरण सेंटर सुद्धा सुरू आहेत. जेवढ्या लसी लवकर येतील तेवढं लसीकरण होईल. ग्लोबल टेंडरबाबत महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. भारतातल्या लसी बाहेर गेल्या नसत्या तर लसीकरण जास्त झालं असतं या जर तरच्या गोष्टी आहेत. मुंबई उपनगरचा पालकमंत्री म्हणून माझ्यावर मुंबईत जास्तीत जास्त लसीकरण करून घेण्याची जबाबदारी आहे. येत्या ७ दिवसात मुंबईतील संपूर्ण लसीकरण करु. भाजप प्रत्येक गोष्टीत राजकारण करत असतं त्यांना ते करू द्या, असंही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button