विधानपरिषदेसाठी राज्य सरकारने पाठवलेल्या प्रस्तावावर राज्यपाल कुठली भूमिका घेणार

Governor Bhagat Singh Koshyari

मुंबई : राज्यपालनियुक्त विधानपरिषदेच्या १२ आमदारांच्या निवडीसाठी पाठवलेली यादी २१ नोव्हेंबरपर्यंत मंजूर करण्यात यावी, अशी विनंती राज्य सरकारने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांना केली होती. त्याची मुदत आज संपत असताना महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi) पाठवलेल्या या यादीवर शिक्कामोर्तब करणार की फेटाळणार याकडे सगळ्यांचे लक्ष्य लागलेले आहे.

१२ पैकी ८ नावांचा विरोध करत मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) एक याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामधील एकनाथ खडसे, राजू शेट्टींसह आठ नावांना आक्षेप घेण्यात आला आहे. त्यावर २४ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. त्यातच राज्य सरकारने केलेल्या विनंतीनुसार राज्यपालांनी आज निर्णय घेतला नाही तर सरकार कोणतं पाऊल उचलणार हेदेखील महत्वाचं ठरणार आहे.

महाविकास आघाडीकडूने देण्यात आलेली १२ नावांची यादी

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP)
एकनाथ खडसे (समाजसेवा आणि सहकार)
राजू शेट्टी (सहकार आणि समाजसेवा)
यशपाल भिंगे (साहित्य)
आनंद शिंदे (कला)

काँग्रेस (Congress)
रजनी पाटील (समाजसेवा आणि सहकार)
सचिन सावंत (समाजसेवा आणि सहकार)
मुझफ्फर हुसेन (समाजसेवा)
अनिरुद्ध वनकर (कला)

शिवसेना (Shiv Sena)
उर्मिला मातोंडकर (कला)
नितीन बानगुडे पाटील
विजय करंजकर
चंद्रकांत रघुवंशी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER