शेतकरी आंदोलन पुन्हा पेटणार? राकेश टिकैत घेणार बॅनर्जींची भेट

Maharashtra Today

नवी दिल्ली :- केंद्राने तयार केलेल्या नव्या कृषी धोरणाच्या विरोधात देशात मागील आठ महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. देशात एकीकडे कोरोनाचा कहर तर दुसरीकडे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आता पुन्हा एकदा शेतकरी आंदोलन पेटणार असल्याचे दिसत आहे. भारतीय किसान युनियनचे नेते आणि प्रवक्ते राकेश टिकैत (Rakesh Tikait) बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांची भेट घेणार आहेत.

ममता बॅनर्जी यांनी यापूर्वीच शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता. राकेश टिकैत आणि ममता बॅनर्जी यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत राकेश टिकैत यांनी प्रचारात सहभाग नोंदवला होता. तसेच भाजपविरोधी मतदान करण्याचे आग्रही आवाहन केले होते. इतकेच नव्हे, तर मोदी सरकार शेतकरीविरोधी असल्याचा दावाही केला होता.

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये भाजपला टक्कर देत बॅनर्जी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्या. यामुळे मोदींविरोधात एक मजबूत पर्याय तयार झाला. तसेच २०२४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये वाराणसी येथून मोदींविरोधात बॅनर्जी निवडणूक लढवू शकतात, असा अंदाजही वर्तवला जात आहे. या सर्व राजकीय घडामोडींमध्ये राकेश टिकैत यांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते, असे सांगितले जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button