मुख्यमंत्री ‘त्या’ वक्तव्यासाठी संजय राऊतांना समज देणार का? – प्रवीण दरेकर

Maharashtra Today

मुंबई : पुणे येथे एका कार्यक्रमात बोलताना शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत(Sanjay raut) भारतीय जनता पार्टीला ब्लॅक फंगस(Black Fungus) म्हणालेत. भाजपाचे नेते आणि विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर(Praveen Darekar0 यांनी याचा निषेध केला असून यासाठी मुख्यमंत्री)(Uddhav Thackeray) राऊतांना समज देतील का, असा प्रश्न केला आहे.

संजय राऊत यांच्या मनात विरोधी पक्षाबद्दल, त्यातही भाजपाबद्दल किती तिरस्कार भरला आहे हे या वक्तव्यातून दिसते. हे बेभान होऊन केलेले वक्तव्य आहे. राज्यात कोरोनाचे जे मृत्यू झाले, रुग्ण वाढत आहेत त्याला राज्य सरकारचा बेजबाबदारपणा, निश्काळजीपणा आणि आरोग्य व्यवस्था हाताळण्यात आलेले अपयश हेच असल्याने राज्यातील मृत्यू आणि रुग्णवाढीला जबाबदार मविआ सराकर आहे. त्यामुळे मविआ हाच राज्याला लागलेला कोरोना आहे असं म्हटले तर चालेल का, असा प्रसन्न दरेकर यांनी राऊतांना विचारला.

भाजपाचे आमदार गोपीनाथ पडळकर यांनी शरद पवार यांच्याबद्दल असे आक्षेपार्ह वक्तव्य केले होते त्यावेळी भाजपाने हे चूक आहे, अशी समज त्यांना दिली होती असे सांगितले व यासाठी मुख्यमंत्री संजय राऊत यांना समज देणार आहात का, असा प्रश्न केला.

ही बातमी पण वाचा : विरोधक ब्लॅक फंगस; राऊतांची भाजपावर टीका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button