अकोला जि.प. : भाजपला महाविकास आघाडीची साथ; भारिपची सत्ता जाणार?

Akola Zila Parishad-bjp-mahaviaks aghadi

अकोला : अकोला जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांचा भारिप बहुजन महासंघ सत्तेपासून दूर राहणार आहे. भारिपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपला महाविकास आघाडीची साथ लाभली आहे.

जिल्हा परिषदेत सत्ता स्थापण्यासाठी शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येणार आहेत. अध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या सुनील धाबेकरांनी तर उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या गोपाल दातकरांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे एका अपक्षासह २८ इतकं संख्याबळ आहे. दरम्यान, भारिप-बमसं वंचितच्यावतीने जिल्हा परिषद अध्यक्षपदाकरिता प्रतिभा भोजने आणि उपाध्यक्षपदाकरिता सावित्री राठोड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.