ठाकरे सरकार या आत्महत्यांची जबाबदारी घेणार का? देवेंद्र फडणवीसांचा प्रश्न

Uddhav Thackeray-Fadnavis

मुंबई :- रखडलेलं वेतन आणि तोंडावर आलेला दिवाळीचा (Diwali) सण यामुळे चिंतेत असलेल्या राज्यातल्या एसटीच्या दोन कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली. याबाबत अनेकदा पाठपुरावा करूनही सरकारने हालचाल केली नाही. या आत्महत्यांची जबाबदारी सरकार घेणार का? असा प्रश्न माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) ठाकरे सरकारला केला आहे.

ही बातमी पण वाचा : ठाकरे सरकारविरुद्ध ३०२ कलमाखाली गुन्हा नोंदवा; प्रवीण दरेकरांची मागणी

फडणवीस म्हणाले, एसटी कर्मचार्‍यांच्या व्यथा आणि वेदनासंदर्भात सातत्याने पत्रव्यवहार करूनसुद्धा राज्य सरकारने त्याकडे लक्ष दिले नाही. ऐन दिवाळीच्या तोंडावर ही दोन कुटुंबे उघड्यावर आली आहेत. आता तरी सरकारने जागे व्हावे. एसटी कर्मचार्‍यांची कुटुंबे अतिशय हलाखीच्या स्थितीत आहेत. जळगाव आणि रत्नागिरीच्या या दोन घटनांसाठी जे दोषी आहेत, त्यांच्यावर काय कारवाई करणार? या आत्महत्यांची जबाबदारी सरकार घेणार का? असा सवाल त्यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER