ठाकरे बंधू एकत्र येणार ? प्रश्नाच्या उत्तरात राज म्हणालेत …

Raj Thackeray - Maharashtra Today

मुंबई : उद्धव (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) एकत्र येणार का? या प्रश्नाच्या उत्तरात राज ठाकरे यांनी दोन्ही हात आकाशाकडे दाखवत “परमेश्वरालाच ठाऊक” असे उत्तर दिले. परमेश्वराला मानता का? या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणालेत – परमेश्वराला मानतो म्हणूनच परमेश्वरालाच ठाऊक असे म्हणालो. एका मुलाखतीत ते बोल्ट होते. पुढच्या वर्षी मुंबई महापालिकेच्या निवडणुका आहेत. कुणाशी युती होईल का? यावर राज म्हणालेत – निवडणुकीपर्यंत वाटचाल करताना पक्षाची स्वत:ची भूमिका असेल, बाकी पुढचे प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी पाहू. सर्व महापालिका निवडणुकींसाठी पक्षाची स्वत:ची भूमिका असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

कोरोना मानसिक आजार

कोरोनाबाबत बोलताना राज ठाकरे म्हणालेत – कोरोना आजार आहे, पण मानसिक आजार. आताच्या परिस्थितीत निवडणुकीचा विचार नको. लोकांची मानसिकता निवडणुका घेण्याची नाही. समाज राहिला, तरच निवडणुका घेण्याला अर्थ आहे. समाजाचे मन स्थिर होणे महत्त्वाचे आहे. समाज स्थिरस्थावर करण्याचे प्रयत्न करायला हवेत. नेत्यांनी समाज स्थिरस्थावर करण्यावर भर द्यावा, असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button