वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी चौकशीअंती कारवाई करणार – अनिल देशमुख

Anvay Naik - Anil Deshmukh

मुंबई : वास्तुविशारद अन्वय नाईक (Anvay Naik) यांच्या आत्महत्येप्रकरणाची चौकशी करण्यात येईल. चौकशीअंती दोषी आढळलेल्या संबंधितांवर नियमान्वये कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी आज विधानसभेत दिली.

सदस्य प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी विधानसभेत अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणासंदर्भात कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन दिले. त्यांच्या निवेदनास उत्तर देताना गृहमंत्री श्री.देशमुख बोलत होते. यावेळी सदस्य सुनिल प्रभू, ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत (Nitin Raut) यांनीही गुन्हेगारास तत्काळ अटक करण्याची मागणी केली.

Source:- Mahasamvad News

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER