कोविड रुग्णालयांत रुग्णांची लूट?; अजित पवारांनी अधिकाऱ्यांना फटकारले

पुणे : राज्यात कोरोनाचे (Corona)संकट दिवसेंदीवस वाढत चालले आहे. यापार्श्वभूमीवर रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांना लुटण्याचे प्रकार सर्रास सुरु आहे . हे लक्षात घेता उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फटकारले आहे . कोरोना बाधित रुग्णांवर उपचारासाठी रुग्णालयांनी आकारावयाच्या दरासंबंधी यापूर्वीच शासनाकडून जाहीर सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे कुठल्याही रुग्णालयाने त्याहून जादा दर आकारू नये. असा प्रकार झाल्याचे आढळताच संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, तसेच औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येईल, असा इशारा पवारांनी दिला .

विधानभवन सभागृहात आज अजित पवार यांनी पुणे, पिंपरी चिंचवड महानगरांसह पुणे जिल्ह्यातील करोना परिस्थितीचा आणि उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी अजित पवार म्हणाले , ‘ माझे कुटुंब माझी जबाबदारी ‘ मोहिमे अंतर्गत करोनाचे निदान होवून वेळेत उपचार करणे सुलभ होणार असल्याने ही मोहीम अत्यंत प्रभावीपणे राबवा, असे निर्देशही त्यांनी दिले. कोरोना आजारातून बरे झालेल्या रुग्णांसाठी इतर आवश्यक उपचाराबाबतही दक्षता घेण्याच्या सूचना करून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोनाबाधितांची वाढती संख्या विचारात घेता उपचारासाठीच्या सुविधाही सातत्याने वाढविण्यात येत आहेत. करोनाच्या संसर्गाचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून मास्कचा वापर, सुरक्षित अंतर व स्वच्छता या त्रिसूत्रीचा अवलंब करावा. कोरोना साथीला कुणीही सहजपणे घेऊ नये. या साथीवर मात करण्यासाठी आपली जबाबदारी लक्षात घेत शासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही अजित पवार यांनी केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER