उपद्रवी ‘असिमन्टमॅटिक’ कार्यकर्त्यांचा लवकरच करणार बंदोबस्त; पंकजा मुंडेंचा इशारा

Pankaja Munde

अंबाजोगाई : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढविणारे लक्षणे नसलेले असिमन्टमॅटिक रुग्ण जसे समाजासाठी घातक ठरत आहेत. तसेच राजकारणात वरुन एक आणि आतून एक असलेले कार्यकर्ते घातक असतात. अशा उपद्रवींची पारख झाली असून या ‘असिमन्टमॅटिक’ कार्यकर्त्यांचा लवकरच बंदोबस्त करण्यात येईल असा इशारा माजी मंत्रीव भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी दिला.

एकनाथ खडसे यांनी भाजपा सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर पंकजा मुंडे यांच्या पक्षांतराचा मुद्दा सुद्धा पुन्हा चर्चेत आला आहे. त्या शिवसेनेत जाणार का? की आणखी कुठे जाणार? याबाबत तर्क वर्तवणे सुरू आहे. विधानसभेच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पंकजा पक्ष आणि राजकारणापासून अलिप्त झाल्यापासून त्या भाजपा सोडणार अशी चर्चा सुरु झाली होती. शनिवारी आ. नमिता मुंदडा यांच्यावतीने पंकजा मुंडे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. त्यावेळी बोलताना मुंडे यांनी या सर्व चर्चेवर भाष्य करताना, त्यांच्या पक्षांतराच्या अफवा पसरविणाऱ्यांचा समाचार घेतला.

निवडणुकीत पराभूत झाले असले तरी लोकांपासून दुरावले नाही. इंदिरा गांधींपासून अनेकांचा पराभव झाला आहे. यात मी नवीन नाही. जनतेशी जुळलेली नाळ तुटू देणार नाही. आता पक्षाने माझ्यावर मोठी जबाबदारी दिल्याने पुन्हा जोमाने कामाला सुरुवात केली आहे, असे त्या म्हणाल्या.

मी मंत्री असतांना जिल्ह्यात विकास कामांसाठी भरघोस निधी आणला. मात्र, यांना कामे करता आले नाहीत. या सरकारमध्ये तो निधी वापस गेला. तुम्ही आमच्याच कामांचे नारळ फोडत आहात. काही तरी नवीन आणा, असा टोमणा मुंडे यांनी सत्ताधाऱ्यांना मारला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER