भाजपच्या शोभा बनशेट्टी सोलापूर महापालिकेच्या महापौरपदी

shobha banshetti

सोलापूर : भाजपच्या शोभा बनशेट्टी यांची सोलापूर महापालिका महापौरपदी निवड झाली आहे. आज झालेल्या महापौर पदाच्या निवडणुकीत पालिका सभागृहात भाजपच्या नवनिर्वाचित महापौर शोभा बनशेट्टी यांना सर्वाधिक ४९ मते मिळाली आहेत. सोलापुरात भाजपला प्रथमच सत्ता मिळाली आहे. जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांच्या अध्यक्षतेखाली मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. शोभा बनशेट्टी याची महापौरपदी निवड झाल्यानं भाजपचं कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता.

यापूर्वी शोभा बनशेट्टी यांचे सासरे विश्वनाथ बनशेट्टी हे १९७१ साली महापौर झाले होते. ते सुमारे ५० वर्षे नगरसेवकपदी सलग निवडून आले होते. शोभा बनशेट्टीही गेल्या काही वर्षांपासून सातत्याने निवडून येत आहेत. त्यामुळे त्यांच्या ज्येष्ठतेचा विचार करत भाजपच्या वतीने त्यांना संधी देण्यात आली. तसेच त्या अनुभवी असल्याचे त्यांचा पक्षाने विचार केल्याच बोलल्या जातेय.

महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपने सेनेचा पाठिंबा घेणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे शिवसेनेनेही या निवडणुकीत आपला स्वतंत्र उमेदवार उभा केला होता. परंतु भाजपचत्या शोभा बनशेट्टी यांच्या तुलनेत शिवसेनेच्या कुमुद अंकाराम यांना फक्त २१ मते पडली. काँग्रेसच्या प्रिया माने यांना १८ मते मिळाली. एमआयएमच्या नूतन गायकवाड यांनी उमेदवारी दाखल केली होती. नंतर त्यांनी माघार घेतली. तर बसपच्या चौघा सदस्यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती.