संजू सॅमसन हाच धडाका शेवटपर्यंत टिकवेल का?

sanju Samson - Maharastra Today
sanju Samson - Maharastra Today

संजू सॅमसनने (Sanju Samson) दरवर्षीच्या आयपीएलप्रमाणेच (IPL) यंदाच्या आयपीएललाही दणक्यात सुरुवात केली आहे. कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात त्याने सोमवारी पंजाब किंग्जविरुद्ध (Punjab Kings) ६३ चेंडूंत ११९ धावांची झुंझार खेळी केली. सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर त्याने षटकार लगावला असता तर हीच खेळी विजयी खेळी राहिली असती; पण दुर्दैवाने तसे घडले नाही. तरीसुद्धा आयपीएलच्या इतिहासातील सर्वोत्तम खेळींपैकी ही एक खेळी मानली जाईल यात शंका नाही.

गेल्या चार वर्षांत या यष्टिरक्षक फलंदाजाच्या आयपीएलमधील कामगिरीत एक ठरावीक पॅटर्न दिसून आलाय. तो असा की, आयपीएलच्या सुरुवातीला तो एकदम चांगला खेळतो; पण नंतर मात्र ढेपाळतो. त्यामुळे यंदासुद्धा त्याने शतकी खेळीसह धडाकेबाज सुरुवात केली यात फारसे आश्चर्य नाही; पण शेवटपर्यंत तो आपला फॉर्म टिकवून ठेवू शकेल का, की गेल्या तीन वर्षांच्या अनुभवाप्रमाणे पुढे ढेपाळेल हाच खरा प्रश्न आहे. गेल्या वर्षीही त्याने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध ३२ चेंडूंत ७४ आणि किंग्ज इलेव्हनविरुद्ध ४२ चेंडूंत ८५ धावांच्या खेळी केल्या होत्या.

त्यावरून तो फॉर्मात आहे असेच वाटत होते; पण नंतर तो फक्त ८, ४ आणि ० (शून्य) अशा खेळी करून बाद झाला होता. २०१८ व २०१९ मध्येही असेच घडले होते. त्यावेळी केलेल्या अनुक्रमे ४४१ व ३४२ धावांपैकी ४५.५ टक्के व ४१ टक्के धावा त्याने पहिल्या तीन डावांतच केलेल्या होत्या. २०१७ मधील त्याच्या ३८६ धावांपैकी ३० टक्के धावा पहिल्या दोन डावांतच आल्या होत्या. या चारही वर्षी त्याने १२ पेक्षा अधिकच डाव खेळले आहेत. त्यामुळे संजू सॅमसनने सुरुवात धडाकेबाज करणे हे अपेक्षितच होते; पण हाच फॉर्म त्याने शेवटपर्यंत टिकवून ठेवला तर ते अनपेक्षित ठरणार आहे; कारण २०१७ पासूनची आकडेवारी त्याचे वेगळेच चित्र मांडतेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button