संभाजीराजे छत्रपती खासदारकीचा राजीनामा देणार का ??

Sambhaji Raje Chhatrapati

मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी राज्यभर दौरा करून राज्यसभेचे सदस्य असलेले संभाजीराजे छत्रपती यांनी गुरुवारी दुपारी राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. संभाजीराजे हे शुक्रवारी त्यांची भूमिका जाहीर करणार आहेत. ते खासदारकीचा राजीनामा देणार अशी शक्यता वर्तविली जात आहे. शुक्रवारच्या पत्र परिषदेत ते राजीनाम्याची घोषणा करतील आणि त्याचबरोबर मराठा समाजासाठी (Maratha Community) स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करीत असल्याचे जाहीर करतील असे संकेत मिळत आहेत.

संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) हे राज्यसभेवर राष्ट्रपती नियुक्त सदस्य आहेत. ते भाजपचे खासदार मानले जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना राज्यसभेवर पाठविण्यासाठी पुढाकार घेतला होता. मराठा समाजाचे नेतृत्व करायचे तर कोणतेही पक्षीय बंधन आता ठेवायचे नाही अशा भूमिकेप्रत संभाजीराजे छत्रपती आले असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

शरद पवार यांची संभाजीराजे छत्रपती यांनी भेट घेतली तेव्हा खासदारकीचा राजीनामा देण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला असे समजते.

कोणत्या एका पक्षाच्या बंधनात राहण्याऐवजी मराठा समााजासाठी लढा उभारण्यात आपल्याला अधिक रस असल्याची भावना त्यांनी या भेटीत बोलून दाखविल्याचे म्हटले जाते. उद्या खरेच संभाजीराजे छत्रपती यांनी खासदारकीचा राजीनामा दिला तर भाजपसाठी (BJP) तो एक मोठा धक्का असेल. ते आणि राज्यसभा सदस्य छत्रपती उदयनराजे हेही सध्या भाजपसोबत आहेत.

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून संभाजीराजे छत्रपती यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्यास शिवसेना, राष्ट्रवादीच्या खासदार काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. मराठा समाजाचे पाठबळ असलेले हे दोन प्रमुख पक्ष आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button