सचिन पायलट-अशोक गहलोत युद्ध थांबल्यानंतर पुन्हा सुरू होईल का?

Sachin Pilot-Ashok Gehlot

जयपुर : राजस्थानच्या राजकारणात अशोक गहलोत (Ashok Gehlot) विरुद्ध सचिन पायलट (Sachin Pilot) असे चित्र ऊभे झाले होते. काँग्रेसच्या या दोन दिग्गज नेत्यांचा संघर्ष आरपारच्या स्थितीत आला होता.गहलोत यांच्यासारख्या मुरब्बी राजकारण्यासोबत पायलट यांचा संघर्ष नवा नाही.

मात्र, अनेक नाट्यमय गडामोडी नंतर हे वादळ शमले होते. परंतु, शमलेले हे वादळ पुन्हा येणार का? सचिन पायलट-अशोक गहलोत युद्ध थांबल्यानंतर पुन्हा सुरू होईल का? असे ट्विट रिपोर्ट न्युज 18ने दिला आहे.

सचिन पायलट – अशोक गेहलोत यांच्यातील संघर्षावर एक नजर –

राजस्थान सरकारच्या शपथविधी सोहळ्यातच या दोन नेत्यांचा संघर्ष दिसून आला होता. माझीही खुर्ची राज्यपालांच्या बाजूलाच लागेल, असं पायलट म्हणाले होते. पण उपमुख्यमंत्री हे पद घटनात्मक नसल्यामुळे असं होऊ शकत नाही, असं गहलोत यांचं मत होतं.

सरकार स्थापन झाल्यानंतर आपल्याला फक्त एक कॅबिनेट मंत्री म्हणून दर्जा मिळत असल्याचं सचिन पायलट यांना जाणवू लागलं.

राजस्थान विधानसभेच्या मुख्य प्रवेशद्वारातून फक्त राज्यपाल, मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्ष यांनाच प्रवेश दिला जातो. पहिली विधानसभा सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवशी सचिन पायलट यांना प्रवेश तर मिळाला. पण जेव्हा ते पुन्हा या विशेष प्रवेशद्वाराने गेले तेव्हा त्यांना आमदारांसाठी असलेल्या रस्त्याने जाण्याची विनंती करण्यात आली.

लोकसभा निवडणुकीत गहलोत यांच्या मुलाचा तर पराभव झालाच, पण काँग्रेसचा सुपडासाफ झाला. गहलोत यांनी यासाठी सचिन पायलट यांना जबाबदार धरलं.

यानंतर गहलोत विरुद्ध पायलट हा संघर्ष तीव्र होत गेला. त्यातच प्रियांका गांधी यांच्या राजकीय एंट्रीने सचिन पायलट हे हायकमांडसमोर कमकुवत होत गेले आणि गहलोत यांनी आपली ताकद वाढवली.

गेल्या एक वर्षांपासून राहुल गांधींसोबत (Rahul Gandhi) बातचीत होत नाही, असं सचिन पायलट खाजगीत बोलताना सांगतात. म्हणजेच दिल्लीत आपल्याला जागा राहिली नसल्याचं ते मान्य करतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER