रोहित पवारांवर गुन्हा दाखल करणार का? प्रवीण दरेकर राष्ट्रवादीला सवाल

Pravin Darekar - Rohit Pawar - Maharastra Today
Pravin Darekar - Rohit Pawar - Maharastra Today

मुंबई :- देशभरात कोरोनाच्या काहर पाहता रेमडेसिवीर इंजेक्शनचा (Remdesivir Injection) तुडवडा असताना गुजरातमध्ये भाजप कार्यालयात हे इंजेक्शन दिलं जात आहे, हे राजकारण नाही का? असा सवाल राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Mailk) यांनी विचारला होता. या मुद्द्यावरून आता भाजप (BJP) नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (BJP Praveen Darekar) यांनी जोरदार पलटवार केला आहे.

आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सोलापुरातल्या कार्यकर्त्यांना रेमडेसिवीर दिल्याचं सोशल मीडियावर पाहायला मिळतं आहे. नवाब मलिक आता रोहित पवारांना हे इंजेक्शन कुठून चोरुन आणलं हे विचारणार का? मलिक हे खरंच निष्पक्ष असतील तर ते रोहित पवार यांच्यावर रेमडेसिवीर चोरुन आणल्याचा गुन्हा दाखल करणार का?’ असा खरमरीत सवाल प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button