भारतीय अर्थव्यवस्थेत उभारी येईल : चेतन भगत

chetan bhagat

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी संसदेत देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प 2021 22 (Budget 2021) सादर केला. कोरोना विषाणूननंतर अर्थव्यवस्था सुरळीत येत असताना सीतारामन म्हणाल्या, की यावेळी अर्थसंकल्प आपत्तीत संधी शोधणार आहे. कोरोना काळानंतर हा पहिला अर्थसंकल्प आहे. यामध्ये आरोग्य आणि कोरोना वॅक्सीनवर सरकारने प्रामुख्याने खर्च ठेवला आहे. आता या अर्थसंकल्पावर प्रसिध्द लेखक चेतन भगत यांनी ट्विट केलं. आपल्या ट्विटमध्ये चेतन भगत यांनी अर्थसंकल्प २०२१ (Budget 2021) ला Very Good असे म्हटले आहे. त्याचबरोबर, त्यांनी म्हटलंय की, यावर्षी भारतीय अर्थव्यवस्थेत उभारी येईल.

अर्थसंकल्पाबद्दल चेतन भगत यांचे हे ट्विट खूप व्हायरल होत आहे. नेटकरी यावर कमेंट्सदेखील करत आहेत. आपल्या ट्विटमध्ये चेतन भगत यांनी लिहिले, “एक बजेट जे सुधारणेकडे जातो. एक बजेट जे उत्पादक क्षेत्रांमध्ये खर्च वाढवते. या बजेटच्या माध्यमातून भारतीय अर्थव्यवस्थेत २०२१ मध्ये उभारी येईल. खूपचं चांगले बजेट आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER