मायक्रोफायनान्समध्ये अडकलेल्या महिलांची सुटका करणार : मुश्रीफ

Hassan Mushrif

कोल्हापूर : अलीकडच्या काळात मायक्रो फायनान्सच्या (Microfinance) दुष्टचक्रात महिला अडकलेल्या अनेक घटना समोर येऊ लागल्या आहेत. त्यावर उपाययोजना करण्यासाठी लवकरच अभ्यासगटाची नियुक्ती करणार असल्याचे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) यांनी केले आहे.

यावेळी मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, देशामध्ये बचतगटांची चळवळ साधारणता ३० ते ३५ वर्षे सुरू झाली. बचत गटामार्फत महिला सक्ष्मीकरण्यासाठी केंद्रशासन व राज्यशासन दरवर्षी हजारोकोटी रुपये खर्च करत आहे. बचत गटांची निर्मिती, अनुदान, सुलभ कर्जे, व्याजामध्ये सवलत अनुदान, बचतगटांनी तयार केलेल्या मालाला बाजारपेठ मिळवून देणेकमी शासनाकडून भरघोस प्रयत्न सुरू आहेत. महिलाशक्ती ही ५०% इतकी आहे. त्यांना सर्वच प्रक्रियेमध्ये सोबत घेतले तर आपला देश महासत्ता बनण्यात वेळ लागणार नाही. यासाठी ग्रामविकास विभागातर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान MSRLM च्या माध्यमातून दरवर्षी ६०० कोटीहून अधिक इतका निधी खर्च केला जातो .

या अभियानातून महिलांच्या आर्थिक व सामाजिक सक्षमीकरणासाठी

यामध्ये गरिबांच्या समुदायस्तरीय संस्था निर्माण करून प्रामुख्याने गरीब, जोखीमप्रवण, मागासवर्गीय, अपंग, विधवा, परित्यक्त्या व एकल महिलांचे स्वयंसहाय्यता गट तसेच ग्रामसंघ व प्रभाग संघ तयार करण्यात येतात. तर उपजीविकेच्या दृष्टीने महिला शेतकरी उत्पादक कंपनी, उत्पादक संघाची स्थापना केली जाते.

  • * महिलांच्या उपजीविकेच्या स्त्रोत निर्मितीसाठी एमएसआरएलएम कडून समुदाय निधी तर बँकांच्या माध्यमातून आवश्यकतेनुसार नियमित कर्जे उपलब्ध करून दिली जातात.
  • * महिला बचत गटांनी तयार केलेल्या मालाला जागतिक बाजारपेठ उपलब्ध होऊन महिलांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी अमेझॉनवर उत्पादने प्रदर्शीत करण्याची संधी निर्माण केली आहे.
  • * बेरोजगार युवक युवतींसाठी दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना व आर सेटी योजनेतून स्वयंरोजगारासाठी मोफत प्रशिक्षण दिले जाते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER