अडचणीच्या काळात पवारांना साथ देणारे राजन पाटील विधानपरिषदेवर जाणार?

Rajan Patil - Sharad Pawar

पुणे : अडचणीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत राहिलेले. राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांना साथ देणारे मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांनी चार दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बारामतीत जाऊन भेट घेतली असल्याची माहिती पुढे येत आहे. विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त जागांसाठी उमेदवारांची चाचपणी सुरू असतानाच पाटील यांनी घेतलेल्या भेटीला मोठे महत्व प्राप्त झाले आहे. सध्या राजन पाटील यांच्या नावाची चर्चा विधानपरिषदेसाठी सुरू आहे. राजन पाटील यांनी भेट घेतल्याने त्यांना संधी मिळू शकते, अशी चर्चा राष्ट्रवादीच्या गोटात सुरु झाली आहे.

राजन पाटील अडचणीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत राहिले. त्यांनी शरद पवारांची साथ सोडली नाही. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक बडे नेते बाहेर पडत असताना पाटील मात्र पक्षाच्या सोबत राहिले. शरद पवार यांनी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधण्यासाठी जो दौरा आखला, त्याची पहिली सभा राजन पाटील यांनी सोलापूरात आयोजित केली होती. त्याच सभेत शरद पवार यांनी पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांना आव्हान दिले होते. ‘मी काय म्हातारा झालोय काय?अजून लै जणांना घरी पाठवायचे आहे’. असे पवार म्हणाले होते. त्या विधानाला राज्यभर प्रतिसाद मिळाला होता. तो व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला होता. या सभेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चैतन्याचे वातावरण तयार झाले होते.

मोहोळ विधानसभा मतदारसंघात प्रा लक्ष्मण ढोबळे, रमेश कदम आणि यशवंत माने यांना निवडून आणण्यात पाटील यांचा मोठा मोलाचा वाटा आहे. त्यांना विधानपरिषदेवर संधी मिळावी अशी मागणी त्यांच्या समर्थकांकडून होत आहे. विधानपरिषदेच्या जागेसाठी त्यांच्या नावाची चर्चा सूरु आहे.राजन पाटील संधी मिळेल असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून सांगण्यात येत असतानाच त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे त्यांची विधानपरिषदेवर वर्णी लागणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. या भेटीबाबत पाटील म्हणाले, सोलापूर जिल्ह्यात पक्षवाढीबाबत चर्चा करण्यासाठी मी भेट घेतली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER