राज ठाकरेंचे भाकीत खरे ठरणार?…तर ‘ठाकरे’ सरकारमागे फटक्यांची माळ लागेल

Uddhav Thackeray & Raj Thackeray

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या सीबीआय तपासाच्या निकालानंतर अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी आज गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मागील अनेक दिवसांपासून त्यांच्यावर या प्रकरणात राजीनाम्यासाठी विरोधकांकडून दबाव होत होता. पण देशमुखांवर झालेले आरोप अत्यंत गंभीर असल्याचा असा ठपका ठेवत उच्च न्यायालयाने सीबीआय तपासाचे आदेश दिल्यानंतर देशमुखांनी राजीनामा दिला. आता मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या एका वक्तव्याची या राजीनाम्यानंतर चर्चा होत आहे, त्यांनी ज्यात केंद्र सरकारकडून चौकशीची मागणी केली होती. केंद्र सरकारने निष्पक्ष चौकशी केली तर फटाक्याची माळ लागेल, असे भाकीत राज ठाकरेंनी केले होते.

मुंबई पोलीस दलातील निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना दरमहा १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट अनिल देशमुख यांनी दिले होते, असे आरोप करणारे पत्र मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. भाजपनंतर राज ठाकरे यांनीही गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या प्रकरणात केंद्राने हस्तक्षेप करुन तपास करावा, केंद्राने योग्य चौकशी केल्यास फटाक्यांची माळ लागेल, असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले होते.

एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे हे निलंबित होते. पोलीस सेवेत त्यांना पुन्हा घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) आग्रह होता. शिवाय शिवसेनेतही वाझे होते. दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि मुकेश अंबानी घनिष्ट मित्र आहेत. याच अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडते. ही स्फोटकांनी भरलेली गाडी पोलिसांनी ठेवली,असा आरोपही होतो. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेले आरोप गंभीर आहेत. अशी घटना राज्याच्या आणि देशाच्या इतिहासात कधीही घडली नसेल. राज्याच्या गृहमंत्र्यांनी इतर जिल्ह्यातील पोलीसप्रमुखांना काय टार्गेट दिले असावे? तरीही मुळ विषय हा आहे की, अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं कोणी ठेवली? केंद्र सरकारने याचा कसून तपास करावा फटक्यांची माळ लागेल, असे भाकीत राज ठाकरे यांनी व्यक्त केले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button