‘त्या’ शेतकर्‍याच्या कुटुंबाला हवी ती मदत देणार : गृहमंत्री अनिल देशमुख

anil deshmukh

नागपूर : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील शेतकर्‍याने केलेल्या आत्महत्येने अवघे राज्य हादरले आहे. मराठी भाषादिनी या शेतकर्‍याच्या तिसरीत शिकणार्‍या मुलाने ‘अरे बळीराजा करू नको आत्महत्या’ ही कविता सादर केली होती. त्यानंतर अवघ्या दोन तासांनीच त्याच्या वडिलाने आत्महत्या केली. मन सुन्न करणारी ही घटना पुढे आल्यानंतर आज शनिवारी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्या शेतकर्‍याच्या कुटुंबाला हवी ती मदत देणार असल्याचे जाहीर केले आहे.

आज नागपुरात माध्यमांशी बोलताना त्यांनी ही ग्वाही दिली. यावेळी अनिल देशमुख म्हणाले, अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडली आहे. आम्ही आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याच्या कुटुंबास भेट देणार आहोत. त्यांना हवी ती मदतही देणार आहोत.

राज्यातील शेतकर्‍यांच्या प्रश्नांबाबत ते म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने कर्जमाफीचे धोरण राबविणे सुरू केले असून, टप्प्याटप्प्याने कर्जमाफी होणार आहे. येत्या दोन-तीन महिन्यांत शेतकर्‍यांना दिलासा मिळेल, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

मुलाकडून शाळेत ‘बळीराजा नको करू आत्महत्या’ कविता सादर; दोन तासांनी वडिलाची आत्महत्या