प्रियांकाला पुन्हा बॉलिवुडमध्ये परतायचे आहे?

Priyanka Chopra

प्रियांका चोप्राने (Priyanka Chopra) हॉलिवुडमध्ये (Hollywood) करिअर करण्यासाठी बॉलिवुडमधील (Bollywood) कामावर पाणी सोडले होते. हॉलिवुडमध्ये जाणार असल्याने तिने काही सिनेमे नाकारले आणि येथील कलाकार आणि निर्मात्यांना नाराज केले. याबाबतची सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला दिली होतीच. प्रियांका हॉलिवुडमध्ये काही प्रोजेक्ट करीत असली तरी तिला पुन्हा बॉलिवुडमध्ये परतायचे आहे की असा प्रश्न तिची पोस्ट पाहून सगळ्यांच्यात मनात उद्भवत आहे. प्रियांकाने बॉलिवुडमध्ये तिने केलेल्या सिनेमांचा उल्लेख करीत तिच्या अत्यंत आवडीचे तीन चित्रपट आणि त्यातील भूमिकांची आठवण पुन्हा ताजी केली आहे. हे सांगून ती निर्मात्यांना पुन्हा एकदा तिच्या कामाची आठवण करून देत आहे असेही बॉलिवुडमध्ये म्हटले जात आहे.

प्रियांकाने 2002 मध्ये तामिळ भाषेतील सिनेमातून रुपेरी पडद्यावर आगमन केले होे. त्यानंतर प्रियांकांने सनी देओल अभिनीत ‘द हीरो- लव स्टोरी ऑफ स्पाय’मधून बॉलिवुडमध्ये पदार्पण केले होते. गेंल्या 17 वर्षात प्रियांकाने ‘अंदाज’, ‘मुझसे शादी करोगी’, ‘ऐतराज’, ‘ब्लॅकमेल’, ‘ब्लफमास्टर’, ‘क्रिश’, ‘डॉन’, ‘फॅशन’, ‘दोस्ताना’, ‘कमीने’, ‘अंजाना अंजानी’, ‘अग्न‍िपथ’, ‘गुंडे’, ‘जय गंगाजल’ सह अनेक सिनेमात चांगल्या भूमिका साकारलेल्या आहेत. या सिनेमातील तिच्या काही भूमिका प्रेक्षकांच्या आजही आठवणीत आहेत. प्रियांकाने तिच्या इंस्टाग्रामवर तिच्या सिनेमांची आणि त्यात साकारलेल्या भूमिकांची नावे दिलेली आहेत. या भूमिकांबाबत बोलताना प्रियांका म्हणते, या अशा भूमिका आहेत ज्या खूपच चांगल्या आणि कॉम्प्लेक्स होत्या. यासोबत प्रियांकाने ‘बाजीराव मस्तानी’, ‘बर्फी’ आणि ‘सात खून माफ’ याच तीन सिनेमांचा उल्लेख केला आहे आणि त्यातील भूमिकांची नावे दिली आहेत.

प्रियांकाने पोस्टमध्ये लिहिले आहे, 3 खूप चांगल्या आणि कॉम्प्लेक्स भूमिका बॉलिवुडमधील अत्यंत उत्कृष्ट दिग्दर्शकांसाठी मी साकारल्या आहेत. या भूमिका अत्यंत मेहनतीने, संघर्ष करून आणि खूपच लवचिकतेने साकारल्या होत्या. हे असे दिग्दर्शक आहे जे स्वतःच एक संस्था आहेत. संजय लीला भंसाळींची काशीबाई (बाजीराव मस्तानी), विशाल भारद्वाज यांची की सुसन्ना (7 खून माफ) आणि अनुराग बसु यांची झिलमिल (बर्फी) सिनेमातील या भूमिका आहेत. सध्या हे तिन्ही दिग्दर्शक मोठे सिनेमे बनवण्याच्या तयारीत आहेत. त्यांची प्रशंसा केली तर त्यांच्या नव्या प्रोजेक्टमध्ये काम मिळेल अशी अपेक्षा प्रियांकाला वाटत असल्याचे सांगितले जात आहे, प्रियांकाची ही मोहिम किती यशस्वी होते ते आगामी काही काळात दिसेलच.

ही बातमी पण वाचा : दीपिका पदुकोणने सुरु केली ‘ऑडियो डायरी’

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER