… त्यांची वाट लावल्याशिवाय शांत राहणार नाही; शिवेंद्रराजेंचा शशिकांत शिंदेंना इशारा

Shashikant Shinde - Shivendra Raje Bhosale

सातारा : साताऱ्याचे (Satara) आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendra Raje Bhosale) आणि कोरेगाव मतदार संघाचे आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांच्यातला वाद चांगलाच तापला आहे. शिवेंद्रराजे भोसले यांनी शशिकांत शिंदे यांना दम दिला – माझी वाट लागली तरी चालेल, माझं सर्व संपले तरी चालेल पण मी त्याची वाट लावल्याशिवाय शांत राहणार नाही.

आमदार शिवेंद्रराजे भोसले भाजपात (BJP) आल्यानंतर साताऱ्यातील राष्ट्रवादीची (NCP) पकड कायम राखण्यासाठी आमदार शशिकांत शिंदे आक्रमक झाले आहेत. शिवेंद्रराजे यांनी शशिकांत शिंदेंच्या मूळ गावातील जावली या भागावर चांगलीच पकड घेतल्याने संघर्ष तीव्र झाला आहे.

शशिकांत शिंदे खाजगीत आरोप करतात की, विधानसभेच्या निवडणुकीत मला हारवण्यात शिवेंद्रराजेंचा मोठा हात आहे, म्हणून मी माझ्या जावली खोऱ्यात त्यांना त्रास देणार. याला उत्तर म्हणून आता शिवेंद्रराजे भोसले यांनी जावली येथील कुडाळ येथे झालेल्या छोट्या कार्यक्रमात शशिकांत शिंदेंना जाहीर आव्हान देत – माझी वाट लागली तरी चालले पण मी त्यांची ही वाट लावणार, असा सज्जड दम दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER