फार काळ विरोधी पक्षात राहणार नाही; फडणवीस यांच्या विधानाने खळबळ

Devendra Fadnavis

मुंबई : आपल्याला फारकाळ विरोधी पक्षात राहायचे नाही पण आज सक्षम विरोधी पक्षाची भूमिका बजावून सरकारला जनतेच्या प्रश्नांवर जाब विचारा असे वक्तव्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केल्याने राजकीय वर्तुळात त्याची जोरदार चर्चा आहे.

निमित्त होते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांच्या लेखाजोखा या पुस्तकाचे. विरोधी पक्षनेते म्हणून वर्षभर केलेल्या कामगिरीचा आलेख दरेकर यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून मांडला आहे. या समारंभात बोलताना फडणवीस यांनी नजीकच्या काळात राज्यात राजकीय भूकंप होणार असे एकप्रकारे सूचित केले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राज्यात काही नवीन राजकीय समीकरण जुळून येणार का याची चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे.

विदर्भ माझ्या रक्तात आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दोन दिवसांपूर्वी नागपुरात आयोजित कार्यक्रमात म्हणाले होते. त्यावर फडणवीस यांनी ठाकरेंना टोला हाणला. केवळ विदर्भाचे रक्त असून चालत नाही विदर्भ आणि मराठवाड्यावर होणारा अन्याय आधी थांबवला पाहिजे. मग विदर्भाच्या रक्तावर बोला, असे फडणवीस यांनी सुनावले.

फडणवीसांनी मेट्रोवरून सरकारला काढले चिमटे
मुंबईतील मेट्रो-३ कधी होणार माहिती नाही. या मेट्रोत बसून मुंबईच्या विमानतळावर मी कधी पोहोचणार माहिती नाही या शब्दात फडणवीस यांनी ठाकरे सरकारला चिमटे काढले आहेत. फडणवीस हे बुधवारी दिल्लीत होते आणि मुक्कामाच्या ठिकाणावरून ते मेट्रोने दिल्ली विमानळावर गेले होते. त्याचा उल्लेख करून फडणवीस यांनी टिष्ट्वटमध्ये असे म्हटले आहे की, मी दिल्लीतील भेटीत मेट्रोमध्ये बसलो आणि अगदी कमी वेळेत विमानतळावर पोहोचलो. माहिती नाही मी मुंबईत मेट्रो ३ मध्ये बसून कधी विमानतळावर पोहोचू शकेल?

फडणवीस यांच्या या वक्तव्याची लगेच प्रतिक्रिया उमटली. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) म्हणाले की  मुंबई मेट्रोची फडणवीस यांना फारच चिंता असेल तर त्यांनी अडथळे आणू नयेत म्हणजे तेही मेट्रोने विमानतळावर पोहोचतील आणि अगदी वेळेत नागपूरचे विमान पकडतील. काहींना त्यांच्या राज्यात बॉलिवूड बनवायचे आहे. मात्र त्यासाठी मुंबई आणि महाराष्ट्राला बदनाम का करता? आजवर जगाला सुरतेची लूट माहिती होती. मुंबईची लूट कराल तर फसाल असा इशारा त्यांनी दिला.

कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांच्या विधानाचे उमटले तीव्र पडसाद
पूर्वी मुंबई-कर्नाटक इलाखा होता. त्यामुळे मुंबईवर आमचाही हक्क असल्याची कर्नाटकातील जनतेची भावना आहे, असे वादग्रस्त विधान कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवादी (Laxman Savadi) यांनी केल्याने वातावरण तापले.  सीमाप्रश्नाचा नीट अभ्यास करा, काही वेडे काहीबाही बरळत असतात असे  शिवसेना (Shiv Sena) नेते खा.संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सुनावले. तर, ‘सवादी यांचे हे विधान म्हणजे मुंबई केंद्रशासित प्रदेश करण्याचा भाजपचा (BJP) डाव असल्याची टीका काँग्रेसचे (Congress) प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER