वाढीव वीजबिल भरणार नाही ; अनाठायी निर्णय घेऊ नका : कृती समितीचा इशारा

Mahavitran

कोल्हापूर : विज बील भरणार नाही, महावितरणने अनाठाई निर्णय घेऊ नये, यानंतर जी परिस्थिती उद्भवेल त्यास सर्वस्वी निर्णय घेणारे जबाबदार असतील, असा इशारा, महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन कोल्हापूर (Maharashtra State Irrigation Federation Kolhapur) व कृती समीतीने दिला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पक्षीय प्रमुखांची विज बील माफिबाबत बैठक झाली. या बैठकीमध्ये सर्वानुमते कोरोनासाठी ६ महिने कालावधीसाठी लॉकडाऊन होते. त्या ६ महिन्याचे विजेचे संपूर्ण बील माफ करण्याचा एकमुखी ठराव झाला. सर्व संघटना संस्था व सर्वस्तरातील नागरिक विजबीले माफ करा, अशी मागणी करत आहेत. कोणतेही कारण अथवा स्पष्टीकरण न देता ६ महिन्याचे वीज बील माफ करावे त्या शिवाय चर्चा करणेसाठी दुसरा मुद्दा नाही, असे या बैठकीत ठरले.

शासनाचे प्रतिनीधी व राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी स्पष्ट केल्यामुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील बीजमंडळाचे अधीकारी व कर्मचारी कदाचीत विज बील बसुलीसाठी कनेक्शन तोडण्यासारखे उपाय करु शेकतील अशी शक्यता आंदोलकांना वाटते. असा आत्मघतकी निर्णय विज मंडळ अधिकारी व कर्मचार्यांनी घेऊ नये जर असा प्रकार झाला तर जनता व विजमंडळ संघर्ष अटळ आहे. त्यातुन कांही बरे वाईट उद्भवल्यास त्याची संपुर्ण जबाबदारी विज मंडळ व शासनाची राहील, असा इशारा आंदोलकानी दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER