भाजपात प्रवेश करणार नाही, सचिन पायलट यांचे स्पष्टीकरण

Sachin Pilot

जयपूर : सचिन पायलट यांनी बंड पुकारल्याने ते भाजपात जातील या चर्चांना उधाण आले आहे. मात्र सचिन पायलट यांनी आपण भाजपात प्रवेश करणार नसल्याचं सांगितलं आहे. सचिन पायलट भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेणार असून यावेळी त्यांच्या भाजपा प्रवेशाची घोषणा होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. पण सचिन पायलट यांनी एनडीटीव्हीशी बोलताना हे वृत्त फेटाळून लावलं आहे.

ही बातमी पण वाचा:- राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार कोसळणार? सचिन पायलटसह ३० पेक्षा जास्त आमदारांचा भाजपात प्रवेश होऊ शकतो

तर, सचिन पायलट यांनी बंड पुकारले तरी, कॉंगेसकडे 109 आमदारांच्या पाठीब्यांचे स्वाक्षरीचे पत्र असल्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि राजस्थानचे प्रभारी अविनाश पांडे नी यावेळी सांगितले. तसेच, “१०९ आमदारांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नेतृत्त्वाखालील राजस्थान सरकार तसंच सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वावर विश्वास असल्याच्या पत्रावर स्वाक्षरी केली आहे”.

दुरीककडे भाजपाने ‘वेट अँण्ड वॉच’ची भूमिका घेतली असल्याचं कळत आहे. काँग्रेसची महत्त्वाची बैठक पार पडणार असून यावेळी घेण्यात येणाऱ्या निर्णयाकडे भाजपाचं लक्ष असणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER