प्रशासकीय कामात हस्तक्षेप करणार नाही; दिलीप वळसे-पाटील यांची ग्वाही

Dilip Walse Patil - Maharastra Today

मुंबई : सध्याचा काळ अत्यंत अवघड आणि चॅलेंजिंग आहे. मात्र, गृहमंत्रिपदाची जबाबदारी मी पार पाडण्याचे काम करेन, तसेच प्रशासकीय कामात कोणताही हस्तक्षेप करणार नाही, अशी ग्वाही नवे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली.

दिलीप वळसे-पाटील यांनी नवे गृहमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. यावर त्यांनी विविध प्रश्नांची उत्तरे दिली. दिलीप वळसे-पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या सर्वांचे नवी जबाबदारी दिल्याबद्दल आभार मानले.

“मी आजच पदभार स्वीकारला आहे. मी ही जबाबदारी पार पाडेन. सध्याचा काळ अवघड आणि चॅलेंजिंग आहे. कोरोनामुळे पोलीस फोर्स रस्त्यावर आहेत. फिल्डवर काम करत आहे. पोलीस दलाचे काम कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे आहे. तरीही कोरोनामुळे नाइलाजाने त्यांना ही ड्युटी करावी लागत आहे. त्यातच आता एप्रिलमध्ये विविध सण-उत्सव आहेत. प्रत्येक धर्मीयाच्या दृष्टीने हे महत्त्वाचे दिवस आहेत. त्यामुळे या महिन्यात आपल्यासमोर आणखी चॅलेंजिंग परिस्थिती असणार आहे.” असे वळसे-पाटील म्हणाले.

पोलीस दलात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित अधिकारी असल्याचे वळसे-पाटील यांना विचारण्यात आले. यावर कोणाच्या निष्ठा काय आहेत, हे तपासण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. काल उच्च न्यायालयाने परमबीर सिंग प्रकरणी जो निर्णय दिला, त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहे. तसेच कोर्टाने जो आदेश दिला आहे, त्याला आम्ही पूर्णपणे सहकार्य करू, असेही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button