अक्षयकुमारच्या ‘बेल बॉटम’ या चित्रपटात नोरा फतेही दिसणार का?

nora Fatehi & Akshay Kumar

नुकतीच बॉलिवूड अभिनेत्री नोहा फतेही हिच्याबद्दल अशी बातमी आली होती की, ती अक्षयकुमारच्या ‘बेल बॉटम’ या चित्रपटाचा एक भाग आहे; पण आता या वृत्तांना नोराच्या प्रवक्त्याने नकार दिला आहे. ते म्हणतात की, नोरा अक्षयच्या चित्रपटाचा भाग नाही. ज्या बातम्या समोर येत आहेत त्या निराधार आहेत. त्यात कोणतेही सत्य नाही.

‘बेल बॉटम’ या चित्रपटामध्ये खास आयटम साँग दाखविण्यात येणार असून त्यावर नोरा नृत्य करताना दिसणार असल्याचे अनेकदा म्हटले आहे. एका मतानुसार नोराच्या प्रवक्त्याने सांगितले की, “नोरा अक्षयकुमारच्या चित्रपटाचा भाग नसल्याचे आम्हाला स्पष्ट करून सांगायचे आहे. नोरा चित्रपटात असल्याचे वृत्त चुकीचे आणि निराधार आहे.

‘सांगण्यात येते की अक्षयकुमारने नुकतेच ‘बेल बॉटम’ या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. त्याचे पहिले पोस्टरही रिलीज करण्यात आले असून, यात अक्षयकुमार दमदार लूकमध्ये दिसला. या चित्रपटाचे दिग्दर्शन रणजित एम. तिवारी यांनी केले आहे. या चित्रपटात अक्षयकुमारव्यतिरिक्त वाणी कपूर, हुमा कुरेशी, लारा दत्ता असे स्टार दिसणार आहेत. हा चित्रपट २ एप्रिल २०२१ रोजी प्रदर्शित होणार आहे.

नोराबद्दल बोलायचे तर, नुकतेच तिचे व्हिडीओ सॉंग ‘नाच मेरी राणी’ रिलीज झाले, ज्यामध्ये ती धमाकेदार डान्स करताना दिसली. हे गाणे गुरू रंधावाने गायले आहे. व्हिडीओमध्ये तो नोराबरोबर डान्स करतानाही दिसला आहे. या गाण्याचे बोल तनिष्क बागची यांनी लिहिले असून त्यानेच संगीत दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER