नाना पटोले काही वेळात विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देणार?

Nana Patole

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचा (Congress) नवा प्रदेशाध्यक्ष कोण असणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. राज्यातील काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये नाना पटोले यांचे नावजवळपास निश्चित झाले असून, ते काही वेळातच विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे.

नाना पटोले (Nana Patole) आज दुपारच्या सुमारास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) याना भेटण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहावर गेले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत त्यांनी आभार मानले आहे. या भेटीनंतर ते विधानभवनाकडे रवाना झाले असून विधानसभा उपाध्यक्ष्याना राजीनामा सोपवणार असल्याची माहिती पुढे आली आहे.

दरम्यान, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षासोबत महाराष्ट्रात आणखी काही संघटनात्मक बदल केले जाण्याची शक्यता आहे. राज्यातील काँग्रेसचे कार्याध्यक्ष बदलण्यासाठी हायकमांडने आग्रही भूमिका घेतली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. विद्यमान पाच कार्याध्यक्षांसह कार्याध्यक्षपदात वाढ करण्याची पक्षश्रेष्ठींची रणनीती आहे. संघटनात्मक बदल करताना मंत्र्यांऐवजी पूर्णवेळ पक्षासाठी काम करणाऱ्यांना संधी देण्याकडे काँग्रेस पक्षश्रेष्ठीचा कल असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER