मुलाखतीची तारीख ठरवण्यासाठी फडणवीसांना पुन्हा भेटणार – संजय राऊत

विरोधकांशी जास्त संवाद ही बाळासाहेबांची शिकवण ; सरकार पाच वर्षे पुर्ण करणार

devendra-fadnavis-sanjay-raut
devendra-fadnavis-sanjay-raut

मुंबई : शिवसेनेचे (Shivsena) नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतल्यापासून राज्याच्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना पेव फुटले आहे. या चर्चांना वाव मिलेल अशी विधानेदेखील भाजप नेत्यांकडून होत असल्याने राज्यात सत्तापालट होणार का याबाबत बोलले जात आहे. मात्र, या सर्व चर्चांचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कंडन केले आहे.

आज आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक प्रश्नांचा उलगडा केला. माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच विधान केले की, राज्यात मध्यावदी निवडणुका होणार पाटील यांच्या विधानाचे संजय राऊत यांनी खंडन केले आहे. ते म्हणाले, सरकार पाच वर्षे पुर्ण करणार. तसेच, फडणवीस भेटीवर राऊत म्हणाले की, विरोधकांशी जास्त संवाद ही बाळासाहेबांची शिकवण आहे.

एवडेच नाही तर पाटील यांच्या चहा बिस्कीटांच्या विधानाचा आधार घेत राऊत म्हणाले, राजकीय पक्षांमद्ये संवाद असायला हवा. होय फक्त चहा बिस्कीटांवर चर्चा झाली नाही. देवेंद्र फडणवीस हे राज्यातील महत्वाचे नेते. फडणवीसांची मुलाखत ‘अनएडिटेड’च असेल. असेही राऊत यांनी सांगितले.

तसेच,ते म्हणाले, ‘मुलाखतीची तारीख ठरवण्यासाठी फडणवीसांना पुन्हा भेटणार’ एवढेच नाही तर, राऊत म्हणाले, अमित शाह आणि राहुल गांधींचीही मुलाखत घेणार.

संजय राऊत यांनी यावेळी हेदेखील मान्य केले की, फडणवीस आम्ही जरी भेटत नसलो तरी चर्चा सुरू असते. राजकीय पक्षांमध्ये संवाद असलाच पाहिजे विरोधकांशी जास्त संवाद ही बाळासाहेबांची शिकवण असे राऊत यांनी फडणवीस भेटीवर स्पष्टीकरण दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER