महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करणारे ‘मराठी भय्ये’ माफी मागणार का?- जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad Tweet

मुंबई : सुशांत सिंह राजपूतची (Sushant Singh Rajput) हत्या झाली नसून आत्महत्या झाली असल्याचा अहवाल एम्सने दिला आहे. या अहवालानंतर महाराष्ट्र आणि मुंबईवर टीका करणाऱ्यांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी मिस्कील टीका केली आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्युप्रकरणात महाराष्ट्र पोलिसांना (Maharashtra Police) बदनाम करणारे ‘मराठी भय्ये’ माफी मागणार का? असा प्रश्न आव्हाड यांनी विचारला आहे.

आव्हाड यांनी ट्विट करत म्हटले आहे की, ‘सुशांत प्रकरणात काही न्यूज चॅनेल्स, मराठी भय्ये आणि भाजपच्या नेत्यांनी महाराष्ट्र आणि महाराष्ट्र पोलिसांची नाहक बदनामी केली. आता सीबीआयने मान्य केले आहे की, सुशांतने आत्महत्याच केली. महाराष्ट्र आणि महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करणारे ‘मराठी भैय्ये’ आता माफी मागणार का?’ मराठी भय्ये म्हणणाऱ्या आव्हाडांचा रोख नेमका कोणाकडे आहे, याविषयी सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER