नंदीग्राममध्ये पराभवानंतरही ममता मुख्यमंत्री होणार? जाणून घ्या संविधानातील तरतुदी

mamata banerjee - Maharashtra Today

नवी दिल्ली : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत आणि तृणमूल काँग्रेसने यात मोठा विजय मिळविला आहे. तर पश्चिम बंगालमध्ये सहजच बहुमत मिळवत राज्यात तिसऱ्यांदा तृणमूल काँग्रेस सत्ता स्थापन होणार हे निश्चित असले तरी राज्यात मुख्यमंत्रिपदाचे काय होणार? याची चांगलीच चर्चा रंगली आहे.

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला २१३ तर भाजपला ७७ जागांवर विजय मिळाला आहे. असे असले तरी तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना नंदीग्राम विधानसभा मतदारसंघात पराभव स्वीकारावा लागला आहे. विधानसभा निवडणुकीतील नंदीग्राम मतदारसंघात मुख्यमंत्री – तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार ममता बॅनर्जी यांचा भाजपचे उमेदवार सुवेंदू अधिकारी यांनी १ हजार ७३६ मतांनी पराभव केला आहे.

निवडणूक विश्लेषकांचे म्हणणे आहे की, ममता बॅनर्जी निश्चितपणे पुन्हा एकदा बंगालच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होतील. भारतातील तीन सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री नीतीशकुमार, योगी आदित्यनाथ आणि उद्धव ठाकरे हे विधान परिषदेचे सदस्य आहेत. मात्र ते विधानसभेचा भाग नाहीत. मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांनी विधानसभा निवडणुका जिंकल्या नाहीत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button