राज्यात पुन्हा पोलीस अधिकारी विरुद्ध सरकारचा रंगणार का कलगीतूरा ?

Maharashtra Today

राज्यात पोलीस दलाचा राजकारण्यांकडून होणारा गैरवापर सचिन वझे (Sachin Vaze) प्रकरणात समोर आला. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी पत्र लिहून गृहमंत्र्यांवर दर महिना १०० कोटी वसूलीचे आदेश दिल्याचे सांगितलं. त्यांनी या प्रकरणी कोर्टात धाव घेतली. या आरोपामुळं महाविकास आघाडीची प्रतिमा डागाळली. इतके दिवस बचावाच्या पावित्र्यात असणारे महाविकास आघाडीचे नेते आता पुन्हा आक्रमक झालेत. याला कारण आहे रश्मी शुक्ला (Rashmi Shukla), फोन टॅपिंग प्रकरण आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा घोटाळा (Phone tapping case and scandal of transfer of police officers).

पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये घोटाळ्यानं वेगळं वळण घेतलं. मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी गुरुवारी मुख्यमंत्र्यांसमोर अहवाल सादर केला. राज्याच्या गुप्तहेर विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्लांवर बेकादेशीर महाविकास आघाडीच्या मंत्र्यांचे आणि नेत्यांचे फोन टॅप केले. सरकार यंत्रणाचा वापर बेकायदेशीर रित्या रश्मी शुक्लांनी केल्याचं कुंटे म्हणात.

माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी रश्मी शुक्लांच्या अहवालाचा आधार घेत शासकीय पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या देण्याच्या प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी मुख्यसचिवांकडून अहवाल मागवला. या अहवालामध्ये रश्मी शुक्लांच्या अहवाल खारिज करण्यात आलाय.

कंटे यांनी रिपोर्ट अहवालात सांगितलय, २०२० मध्ये भारतीय पोलीस सेवा (आय.पी.एस.) मधील एकूण १६७ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. ज्यातले चार अपवाद सोडले तर उर्वरित बदल्या पोलीस अस्थापनाच्या बोर्ड -१ च्या शिफारसीनूसार करण्यात आल्यात. तत्कालीन डी. जी. पी. सुबोध कुमार जैस्वाल यांनी तात्कालीन गृहखात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्याकडे अहवाल सोपावला होता. सीताराम कुंटे आता राज्याचे मुख्य सचिव आहेत.

कायदा आणि सुवस्थेचा प्रश्न असल्याचं सांगत रश्मी शुक्लांनी फोन टॅपिंगची परवानगी घेतली होती

आतंकदवादी कारवाई, दंगली इत्यादी गोष्टी घडून राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ नये. परिस्थीती नियंत्रणात राहण्यासाठी फोन टॅपिंग गरजेची असल्याचं सांगत शुक्लांनी फोन टॅपिंगची अनूमती मागितली होती. ही परवानगी मिळाल्यानंतर रश्मी शुक्लांनी फोन टॅप केले त्यात काही पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीबद्दलची बोलणी रेकॉर्ड करण्यात आली.

२५ ऑगस्ट २०२० ला हा रिपोर्ट अतिरिक्त मुख्यसचिव (गृह खातं) यांच्याकडे सोपवण्यात आली. ३१ ऑगस्ट २०२० ला या अहवाला संबंधी माहिती मुख्यमंत्र्यांना देण्यात आली होती. ज्यात म्हणण्यात आलं होतं की रश्मी शुक्लांकडे पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या घोटाळ्या प्रकरणात काही ठोस पुरावे नाहीयेत.

रश्मी शुक्लांनी मागितली होती माफी

या प्रकरणावर राज्याचे गृहमनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड माध्यमांच्या समोर आले ते म्हणाले. “रश्मी शुक्ला यांना जेव्हा फोन टॅपिंगच्या पत्राविषयी समजलं तेव्हा आपण पकडलो गेलो आहोत हे त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे रडल्या. त्या गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे गेल्या तेथेही त्या रडल्या. त्यांनी माफी मागत कारवाई करु नये, अशी विनंती केली. महाराष्ट्र विकास आघाडी सरकार दिलदार आहे. त्यामुळे मन मोठं करुन आघाडी सरकारने तेव्हा रश्मी शुक्ला यांना माफ केलं. मात्र, त्यावेळी याच रश्मी शुक्ला समोर उभ्या राहून नवं बदनामीचं षडयंत्र रचतील हे माहिती नव्हतं.”

महाविकास आघाडीला बदनाम करण्याचं षडयंत्र

महाविकास आघाडी सरकारला बदनमा करण्यासाठी हा डाव रचला जात असल्यांचही आव्हाड म्हणाले, “केंद्र सरकारने काही नियम दिले आहेत. त्यात कोणत्या प्रकारात फोन टॅप करता येतात याविषयी सांगण्यात आले आहे. यात राष्ट्र घातक कृत्य, परकीय देशातील अतिरेकी संघटनेशी संबंध या प्रकारांशिवाय इतर परिस्थिती फोन टॅपिंग करता येत नाही. याला अपवाद येथी शांतता भंग करणाऱ्या व्यक्तीचा फोन टॅप करु शकतो. त्यामुळे रश्मि शुक्ला यांनी जी कारणं दिली होती ती संयुक्तिक नव्हती. त्यांनी ज्या फोन टॅपिंगच्या परवानग्या घेतल्या त्या चुकीच्या नावाने घेतल्या होत्या. परवानगी एकाच्या नावाची आणि फोन टॅपिंग दुसऱ्याची असा प्रकार करण्यात आला. यात अनेक मंत्र्यांचेही फोन टॅप करण्यात आले. हा राईट टू प्रायव्हसीचा भंग आहे. हे अनेकवेळा करण्यात आलं. निष्कारण टॅपिंगच्या नावाखाली बदल्या, बदल्यांच्या नावाखाली मोठं रॅकेट असं महाराष्ट्र विकास आघाडीला बदनाम करण्याच्या षडयंत्राचा मुख्य कोणी असेल तर त्या रश्मी शुक्ला आहे.” असं ही ते म्हणालेत.

रश्मी शुक्ला आहेत तरी कोण?

परमबीर सिंह यांनी नाव घेतलेल्या रश्मी शुक्ला महाराष्ट्र कॅडरच्या वरिष्ठ आय.पी.एस. अधिकारी आहेत. रश्मी शुक्ला फेब्रुवारी 2021 केंद्रीय राखीव पोलीस दलात अतिरिक्त पोलीस महासंचालकपदी प्रतिनियुक्तीवर गेल्या आहेत. महाविकास आघाडीनं त्यांच्यावर अवैधरित्या फोन टॅप केल्याचे आरोप लावलेत. त्यासोबतच त्यांचा गोपनीय अहवाल ही सार्वजनिक झाला. या सर्वाचा विचार करता रश्मी शुक्लांवर कारवाई होऊ शकते असं राजकीय विश्लेष्कांनी व्यक्त केलंय. कारवाई कोणत्याप्रकारे आणि कशी करायची यावर मुख्यमंत्री आणि गृहमंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत मुख्यंत्र्यांनी चर्चा केलीये. महाधिवक्त्यांचा सल्लाही या प्रकरणी घेतला गेला असल्याचं समजतं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER