सततच्या विरोधामुळे जैतापूर आणि नाणार होणार की जाणार?

- भाजपाचे आशिष शेलार यांचा सरकारला टोमणा

ashish Shelar & Mahavikas Aghadi

मुंबई : नोएडाजवळ एक हजार एकर जागेत चित्रनगरी उभारू, अशी घोषणा उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी केली. तेव्हापासून राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार (MVA Govt) बॉलिवूड मुंबईतून पळवण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी ओरड करते आहे.

त्याच वेळी नाणार आणि बुलेट ट्रेनसारख्या मोठ्या प्रकल्पांना मात्र विरोध करते! यावरून भाजपचे आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी सरकारला टोमणा मारला – सततच्या विरोधामुळे जैतापूर आणि नाणार होणार की जाणार? उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ काल मुंबईला आले होते. काही उद्योजकांसोबत चित्रपटसृष्टीतील काही कलाकार- निर्मात्यांना भेटले. यावरूनही महाआघाडी सरकारमधील घटकांनी टीका केली.

याला योगी आदित्यनाथ यांनी उत्तर दिले, मी कोणाचे काढून घेण्याकरिता किंवा हिसकावून घेण्यासाठी मुंबईत आलो नाही. स्पर्धेच्या युगात चांगल्या सुविधा मिळतात त्याला गुंतवणूकदार पसंती देतात. सरकारचे स्थैर्य, पोषक वातावरण महत्त्वाचे असते. उगाचच चिंता कशाला करता! फिल्म सिटीवरून सुरू असलेल्या राजकारणादरम्यान राज्य सरकारची कार्यपद्धती फिल्म सिटीला मारक तर ठरणार नाही ना? असा प्रश्न भाजपा नेते आशिष शेलार यांनी उपस्थित केला. त्यांनी ट्विट केले, सततच्या विरोधामुळे जैतापूर आणि नाणार होणार की जाणार? बुलेट ट्रेनलाही विरोधाचा ब्रेक, तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यपद्धतीमुळे  आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र परराज्यात गेले. अशी कार्यपद्धती फिल्म सिटीला मारक नाही ना ठरणार? महाराष्ट्राचे नुकसान करू नका!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER