या स्टार खेळाडूंशिवायच होईल आयपीएलची सुरुवात?

Ipl Players - Maharastra Today

आयपीएल २०२१ चे (IPL 2021) वारे वाहू लागले आहेत तशा आयापीएलबद्दल घडामोडीसुद्धा वाढल्या आहेत. गेल्या तीन दिवसांत चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) जलद गोलंदाज जोश हेझलवूड (Josh Hazelwood) , रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा (RCB) जोश फिलिप्स (Josh Philips) , सनरायजर्स हैदराबादचा (SRH) मिचेल मार्श (Mitchell Marsh) यांनी आयपीएल २०२१ खेळण्यास नकार कळवला आहे. आयपीएलला यंदा ९ एप्रिलपासून सुरुवात होत आहे.

हेझलवूड आणि मार्श यांनी दीर्घकाळ आपल्याला जैवसुरक्षा बबलमध्ये आणि वेगवेगळ्या ठिकाणी खेळण्यासाठी पुन्हा पुन्हा क्वारंटाईन होणे नको आहे असे म्हणत नकार कळवला आहे. जोश हेझलवूड पुढील दोन महिने कुटुंबासोबत घालवणार आहे आणि क्रिकेटपासून विश्रांती घेणार आहे. गेल्या मोसमात सुपर किंग्जने त्याला तीनच सामन्यात खेळवले होते. ऑस्ट्रेलियाचे आगामी सत्र खूप व्यस्त राहणार आहे. त्यासाठी आपल्याला स्वतःला फिट ठेवायचे आहे असे त्याने म्हटले आहे. असे म्हणून त्याने आयपीएलपेक्षा राष्ट्रीय संघासाठी खेळणे हे आपले प्राधान्य असल्याचे स्पष्ट केले आहे. मिशेल मार्शनेही हीच कारणे दिली आहेत.

रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने जोश फिलीपच्या जागी न्यूझीलंडचा नवोदित यष्टिरक्षक खेळाडू फिन अॕलन याला संघात स्थान दिले आहे. त्याने अलीकडेच बांगलादेशविरुद्ध २९ चेंडूत ७१ धावांची खेळी केली आहे. यासह त्याने आयपीएलमधील आपल्या पदार्पणाचा आनंद साजरा केला आहे. जोश फिलिपने आपण २०२१ च्या पूर्ण मोसमासाठी उपलब्ध नसल्याचे कळविले आहे. त्याला लाईक टू लाईक रिप्लेसमेंट म्हणून फिन अॕलनची वर्णी लागली आहे. फिलीपप्रमाणेच तो सलामीला खेळू शकतो आणि यष्टिरक्षणही करू शकतो. त्याला आयसीबीकडून २० लाखांची बेस प्राईस मिळाली आहे. २१ वर्षीय अॕलनने यंदाच्या मोसमात चार अर्धशतके २० पेक्षा कमी चेंडूंत लगावली आहेत. ५१२ धावा करताना त्याचा स्ट्राईक रेट १९४ चा आहे.

दुसरीकडे जे खेळाडू उपलब्ध नाहीत त्याचा सर्वाधिक फटका दिल्ली कॅपिटल्सला बसला आहे. कासिगो रबाडा, आनरिच नोर्जै व श्रेयस अय्यर हे तीन खेळाडू सध्यातरी दिल्ली कॅपिटल्ससाठी उपलब्ध नाहीत. दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत व्यस्त राहणार आहेत. त्यामुळे पहिल्या तीन-चार सामन्यांसाठी तरी दक्षिण आफ्रिकन खेळाडू उपलब्ध नसतील. त्यांचा नियमित कर्णधार श्रेयस अय्यर खांद्याला झालेल्या दुखापतीने आधीच बाद झाला आहे.

चेन्नई सुपर किंग्जलाही लुंगी एनजीडीशिवाय सुरुवातीचे काही सामने खेळावे लागतील. जोश हेझालवूड नसेल. रवींद्र जडेजासुद्धा कधी खेळू शकेल ते स्पष्ट नाही.

राजस्थान रॉयल्ससाठी जोफ्रा आर्चर हातावरील शस्त्रक्रियेमुळे उपलब्ध नसेल. तो पहिले किमान चार सामने तरी खेळू शकणार नाही.

रॉयल चॅलेंजर्स बंगलोरसाठी जोश फिलीपच्या जागी फिन अॕलन आला आहे. तर अॕडम झम्पा हा विवाहबद्ध होणार असल्याने सुरुवातीचे काही सामने खेळणार नाही.

सनरायजर्स हैदराबादने मिशेल मार्शच्या जागी संघात इंग्लंडच्या मिशेल मार्शचा समावेश केला आहे. मुंबई इंडियन्सला पहिले चार सामने क्विंटन डी कॉकशिवाय खेळावे लागणार आहेत. फाफ डू प्लेसिसही पहिले काही सामने उपलब्ध नसेल.

ही बातमी पण वाचा : गोलंदाजांना आता विकेट मिळायची आणखी 1.38 इंच वाढीव संधी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button