महापालिका आयुक्तांवर हक्कभंग आणणार- इम्तियाज जलील

Imtiaz Jaleel

महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना चार चार महिने पगार मिळत नसल्याने कंत्राटदाराची माहिती तीन महिन्यांपूर्वी आयुक्तांना मागितली. दोनदा पत्र लिहीले तरी खासदार असतांना मला अशी उडवाउडवीची उत्तरे देत आहे. मुळात आयुक्त महापौरांच्या हातची कठपुतली म्हणून काम करत आहेत. त्यांची लेखी तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली. शिवाय त्यांच्यावर हक्कभंगही आणणार असल्याचे एमआयएमचे राज्य अध्यक्ष तथा खासदार इम्तियाज जलील यांनी गुरूवार (दि. १९) घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. पालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना हातात आठ हजार रूपये पगार मिळत असल्याचे कर्मचाऱ्यांनी मला सांगितले. चार चार महिने पगार होत नाही. तात्र कंत्राटदाराला दर महिन्याला पैसे दिले जातात. मग त्या कर्मचाऱ्यांवर अन्याय का? एमआयएमच्या नगरसेवकांना माहिती अधिकारातही माहिती द्यायला महापौरांनी लेखी पत्र देत मज्जाव केला आहे. मात्र विरोधी पक्ष नेत्यांनी त्यांच्या अधिकारात ती कागदपत्रे मिळवली. मुळात आयुक्तांच्या मर्जीने हे सुरू असल्याचे सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली. कंत्राटी कर्मचाऱ्यांचे महापालिका १५ हजार रूपये देते. मग बाकी पैसे जातात कुठे असा सवाल करत काराभारावर इम्तियाज यांनी शका उपस्थित केली.

डेंग्यूचा शहरात कहर झाला असतांना कोणतीही उपाययोजना होत नाही. एन १२ अाणि मध्यवर्ती जकात नाका येथील समस्या वाएत आहेत. तेथील कचरा दहा दिवसांत हटवा अन्यथा एमआयएम तेथे तोडफोड करेल. असा इशारा इम्तियाज जलील यांनी दिला. तसेच जॉब अलर्ट मोफत उपक्रम सुरू करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

ही बातमी पण वाचा : आंबेडकरांनी मी केलेली चूक सांगावी, घरी जाऊन माफी मागेन – इम्तियाज जलील