चौकशी समितीच्या सूचना अमलात आणणार; बाळासाहेब थोरातांसह पटोलेंची रुग्णालयास भेट

balasaheb Thorat - Maharastra Today
balasaheb Thorat - Maharastra Today

पालघर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयात झालेल्या दुर्दैवी घटनेच्या चौकशीसाठी समिती नेमली असून समितीने केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी केली जाईल, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी सांगितले.

आज विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयाच्या ICU ला लागलेल्या आगीची पाहणी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. यावेळी त्यांनी पत्रकारांशीही संवाद साधला. बाळासाहेब थोरात यांनी सांगितले की, “जिल्हा प्रशासन सतर्क असून पूर्ण क्षमतेने काम करत आहे. जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा कोरोना युद्धामध्ये दिवस-रात्र लढत आहे. प्रशासनावर या काळात प्रचंड ताण असला, तरी भविष्यात अशा दुर्घटना घडणार नाहीत, याची काळजी जिल्हा प्रशासन घेईल.” झालेली दुर्घटना अत्यंत दुर्देवी आहे. अशा घटना भविष्यात घडू नये यासाठी प्रशासन नियोजनबद्ध काम करेल, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. दरम्यान, बाळासाहेब थोरात यांच्यासह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेही या रुग्णालयाच्या भेटीला हजर होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button