ऋतिक, सलमान आणि शाहरुख एकाच चित्रपटात अॅक्शन करणार?

Salman Khan - Shahrukh Khan - Hritik Roshan

70 ते 90 च्या दशकात बॉलिवूडमध्ये (Bollywood) मल्टीस्टारर चित्रपट तयार केले जात असत. बॉलिवूडमधील सगळे ए ग्रेडचे कलाकार घेऊन चित्रपट बनवण्याची स्पर्धा निर्मात्यांमध्ये असे. परंतु नंतर सोलो नायकाकडेच निर्मात्यांचा ओढा वळल्याने मल्टीस्टारर चित्रपटांची परंपरा जवळ जवळ खंडित झाली होती. करण जौहर, यश चोप्रा असे काही निर्मातेच मल्टीस्टारर चित्रपट तयार करीत असत. आदित्य चोप्राने (Aditya Chopra) पुन्हा एकदा एका अत्यंत भव्य अशा चित्रपटाच्या निर्मितीला हात घालण्याचे ठरवले आहे असे समजते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आदित्य चोप्रा हॉलिवूडच्या धर्तीवर सुपरहीरो सीरीज बनवण्याचा विचार करीत असून यासाठी बॉलिवूडमधील सर्व मोठ्या कलाकारांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार आहे. मात्र हे सुपरहीरो दैवी शक्ती असणारे नसतील तर शारीरिक क्षमतेने सुपर झालेले दाखवले जाणार आहेत. उदाहरणार्थ सलमान खानचा ‘टायगर’, ऋतिक आणि टायगरचा ‘वॉर’ चित्रपटातील त्यांच्या भूमिकाच पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न या चित्रपटात केला जाणार आहे. ‘मिशन इम्पॉसिबल’ सीरीजच्या धर्तीवर स्पाय यूनिवर्स जॉनर आदित्य चोप्रा बॉलिवूडमध्ये आणण्याचा प्रयत्न करणार आहे.

या स्पाय यूनिव्हर्स चित्रपटासाठी सलमान खान (Salman Khan), शाहरुख खान (Shahrukh Khan), ऋतिक रोशन (Hritik Roshan), कॅटरीना कैफ (Katrina Kaif) आणि दीपिका पदुकोणला (Deepika Padukone) साईन केले जाणार आहे असेही सूत्रांचे म्हणणे आहे. हे सर्व कलाकार गुप्तहेराच्या भूमिकेत या चित्रपटात दिसू शकतील. या चित्रपटाच्या योजनेवर काम सुरु करण्यात आले असून कथानक तयार केले जात आहे. जर सगळ्या गोष्टी जुळून आल्या तर या चित्रपटाच्या शूटिंगला 2023 मध्ये सुरुवात होईल असेही सांगितले जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER