आगामी विधानसभा निवडणुकीत नवीन चेहऱ्याला संधी देऊ – अजित पवार

Ajit Pawar

पिंपरी : काळानुरूप राजकीय बदल होतच असतात. जय-पराजय होतच असतात. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे खचून जाण्याची गरज नाही. आत पुन्हा जोमाने कामाला लागू. आगामी विधानसभा निवडणुकीत नवीन चेहऱ्याला संधी दिली जाईल. तसेच पक्ष संघटनेतही फेरबदल करण्यात येणार असल्याचे संकेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यासाठी ते पिंपरी चिंचवड शहरात आले होते. त्यावेळी

आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बोलताना पवार यांनी भाजपचाही समाचार घेतला. पारदर्शक कारभाराची हमी देत भाजपने महापालिकेत सत्ता मिळवली. मात्र ठेकेदारांमधील रिंग आणि निविदा प्रक्रियेशिवाय मर्जीतील ठेकेदारांना काम दिल्यामुळे पारदर्शकतेचे पितळ उघडे पडल्याचे पवार म्हणाले.