मंदिरे उघडा, अन्यथा जबरदस्ती उघडू; भाजपचा इशारा

Temples- BJP

महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारने मंदिरे उघडली नाहीत तर भारतीय जनता पार्टी (BJP) जबरदस्ती मंदिरे उघडेल, असा इशारा भाजपाने मंदिरे उघडण्यासाठी केलेल्या ‘घंटानाद आंदोलना’त दिला. कोरोनाच्या साथीमुळे बंद असलेली मंदिरे उघडा, या मागणीसाठी भाजपाने शनिवारी राज्यपातळीवर आंदोलन केले. राज्यात दारूची दुकाने, मॉल आणि बाजार उघडले असताना मंदिरे बंद का, असा प्रश्न माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला.

ते म्हणाले, धार्मिक स्थळांशी समाजाचे अनेक वर्ग जुळलेले आहेत, त्यांच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. हा विषय प्रत्येकाच्या आस्थेचा आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) मिरज येथे म्हणाले की, राज्यात १० हजार मंदिरांपुढे भाजपाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. मंदिरे उघडण्यासाठी मविआच्या सरकारला जागे करण्यासाठी हे आंदोलन आवश्यक होते.

सोलापुरातील पंढरपूर, देहू येथील श्रीक्षेत्र, नाशिक येथील रामकुंड, पुण्यातील सरसबाग गणेश मंदिर, कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिर, अहमदनगर येथील शिर्डी मंदिर आणि मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर येथे निदर्शने करण्यात आली. मंदिर खुले झाल्यानंतर भक्त मास्क बांधून मंदिरात येतील. सॅनिटायझर्स आणि सामाजिक अंतराची तरतूद केली जाईल, असे भाजपाच्या एका नेत्याने सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER