… न्यायालयावरही महाराष्ट्रद्रोही म्हणून फटाके फोडणार ? शेलारांचा राऊतांना टोमणा

Ashish Shelar & Sanjay Raut

मुंबई : अर्णब गोस्वामी यांच्या अटकेबाबत जिल्हा सत्र न्यायालयाने काही मुद्दे उपस्थित केले आहेत. त्या.चा उल्लेख करून भाजपाचे नेते आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी सामनाचे कार्यकारी संपादक व शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना टोमणा मारला, आता न्यायालयालाच महाराष्ट्र द्रोही आहे म्हणून फटाके फोडणार का? आता उद्याचा अग्रलेख न्यायालयावर..?

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी अटक केली. या प्रकरणावर आज रायगड जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली त्यावेळी न्यायालयानं काही मुद्दे उपस्थित करत गोस्वामी यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली.

रायगडच्या मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी निवाड्यात उपस्थित केले मुद्दे –

१) २०१८ सालच्या घटनेबाबत कोणताही ठोस पुरावा आलेला नाही त्यामुळे “अ” समरी अहवाल (क्लोजर रिपोर्ट) स्वीकारला गेला.
२) पोलीस कोठडीचे समर्थन करणारे कोणतेही योग्य, संयुक्तिक व कायदेशीर कारण आढळत नाही.
३) पोलिसांना मोघमपणे तपास करता येणार नाही.

याचा उल्लेख करून शेलार यांनी टोमणा मारला – सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी आणि महाराष्ट्रातील ठाकरे सरकारच्या सुडबुध्दीचा, असहिष्णुतेचा पर्दाफाश न्यायालयाने असा केला. आता बोला…!

आता न्यायालयालाच महाराष्ट्रद्रोही आहे म्हणून फटाके फोडणार का? आता उद्याचा अग्रलेख न्यायालयावर..? खंजीर, तलवार, इतिहासातील शब्दांवर उगाच सगळा भार! उडवा उडवा, शब्दांचे फुलबाजे उडवा! रोज उघडे पडा!!,” असाहि टोमणा शेलार यांनी राऊत यांना मारला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER