आरक्षणासाठी पुनर्विचार याचिका दाखल करणार; विजय वडेट्टीवारांचे संकेत

Vijay Wadettiwar

नागपूर : मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार सुप्रीम कोर्टात लवकरच पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे, अशी माहिती राज्याचे मदत आणि पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी दिली आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा कोर्टात जाण्याचे संकेत मिळत आहेत.

मराठा आरक्षणासाठी पुनर्विचार याचिका दाखल करण्यात येणार आहे. यासाठी निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा अहवाल १५ दिवसात येईल. अहवाल आल्यावर पुढे जाणार असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. याचबरोबर, नोकर भरतीत रिक्त पदे आहेत, ते भरले जातील. मुख्य सचिव सोमवारपासून निकालांचा आढावा घेतील. त्यानंतर भेटीचे आदेश काढले जातील. या नियुक्त्या करताना मराठा समाजाचा निर्धारीत कोटा अबाधित राहिल्याचा विचार केला जाईल, असे वडेट्टीवारांनी स्पष्ट केले.

बोगस बियाणे विकणाऱ्यांवर कारवाई करा

आगामी काळात सरकारने धानाला बोनस न देता ते पैसे शेतकऱ्यांना द्यावे. २ हेक्टरपर्यंतच्या पेरणीसाठी ही रक्कम द्यावी. बोनस दिल्यावर त्याचा फायदा व्यापारी घेतात. त्याचा शेतकऱ्यांना फायदा होत नाही. बोगस बियाणे विकणाऱ्यांवर अजामीनपात्रे गुन्हे दाखल व्हावेत, अशी मागणीही वडेट्टीवारांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button