एकत्र लढणार, उद्धव ठाकरेंनी दिले संकेत; नाशिक मनपासाठी महाविकास आघाडीची मोठी योजना

CM Uddhav Thackeray

नाशिक : राज्यात तीन पक्षाचे महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार सत्तेत असल्याने स्थानिक निवडणुकाही एकत्र लढण्याचे संकेत तीनही पक्षाकडून मिळत आहेत. राज्यातील इतर महापालिकांमधून भाजपला (BJP) दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडी एकत्र लढणार अशी चर्चा आहे.

नाशिक महापालिकेत (Nashik Municipal Corporation) सध्या भाजपची एकहाती सत्ता आहे. 122 नगरसेवकांपैकी तब्बल 65 नगरसेवक भाजपचे आहेत. नाशिक महापालिकेत भाजप सत्तेत आहे. मात्र, आगामी महापालिकेच्या निवडणुकीत जर महाविकास आघाडीतील तीनही पक्ष एकत्रित येऊन लढले तर भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात महाविकास आघाडी यशस्वी ठरू शकते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या (CM Uddhav Thackeray) वक्तव्यानंतर स्थानिक राजकारणात ही खलबत सुरू झाली आहे.

जागा वाटपाचा तिढा मात्र काम राहू शकतो,आता शिवसेनेचे (Shiv Sena) 35 नगरसेवक सभागृहात आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) 6, कॉग्रेस (Congress) 6, मनसे (MNS) 5, आरपीआय 1 आणि अपक्ष 4 नगरसेवक आहेत. शिवसेनेचे जास्त नगरसेवक असल्यामुळे शिवसेनेने जर समजूतदारपणा दाखवला नाही तर मोठा गोंधळ होऊ शकतो. यामुळे यावेळी महाविकास आघाडीत शिवसेना काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

विशेष म्हणजे कोण किती जागा लढणार हे वरिष्ठ पातळीवरूनच ठरवलं जाईल. त्यामुळे इथे भाजपचं नमोहरम करण्याच्या दृष्टीकोनातून प्लॅन केला गेला तर मात्र मोठी राजकीय खळबळ उडू शकते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER