ताकद आहे तोवर लढणार : प्रियंका गांधी

Priyanka Gandhi

दिल्ली : मेरठमधील सरधना येथील केली गावात रविवारी काँग्रेसतर्फे महापंचायत बोलावण्यात आली. यावेळी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी या ठिकाणी जनतेला संबोधित केले. “कृषी कायदे मागे घेण्यासाठी कितीही वर्षे लागले तरी काँग्रेस शेतकऱ्यांसोबत उभी राहील. यासाठी शंभर दिवस किंवा शंभर वर्षे लागले तरी शेतकरी आणि काँग्रेस मागे हटणार नाही. जोपर्यंत ताकद आहे तोवर लढणार… संसदेत शेतकऱ्यांचा आंदोलनजीवी, परजीवी उल्लेख करून त्यांचा अपमान करण्यात आला. दिल्लीतील सीमेप्रमाणेच प्रत्येक गावागावांत आंदोलन करा. तुम्ही संकटात असाल तेव्हा काँग्रेस तुमच्या पाठीशी उभी राहील. सुख आणि दु:ख काहीही असो आम्ही तुमच्यासाठी कायम उभे राहू. तुमची लढाई माझी आहे.” असेही प्रियंका गांधी म्हणाल्या.

‘हम दो हमारे दो’चे सरकार
“पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनपासून पाकिस्तान सर्व फिरून आले. ‘हम दो हमारे दो’ मित्र सरकार चालवत आहेत. जे प्रकर्षाने दिसून येत आहे. सरकारला तुमचे ऐकावेच लागेल. सुनावणीशिवाय सरकार पुढे जाऊ शकणार नाही असे वातावरण तयार करा.” असेही प्रियंका गांधी म्हणाल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER