फेसबुक बंद होणार ? सोशल मीडियाने उठवलेला आवाज दाबण्याचा हा प्रयत्न नाही ना … जयंत पाटील

मुंबई : भारतात फेसबुक(Facebook), इन्स्टाग्राम आणि ट्विटर बंद होणार असल्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. याबाबत, जलसंपदामंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील (Jayant Patil)यांनीही आपले मत व्यक्त केले.

जयंत पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, फेसबुक आणि ट्विटरवर बंदी येणार का? असा सवाल उपस्थित केला आहे. त्यानंतर, पेट्रोल दरवाढीच्या मुद्द्यावरुन सोशल मीडियाने(Social Media) उठवलेला आवाज दाबण्याचा हा प्रयत्न नाही ना, असे संकेत त्यांनी दिले आहेत. तर, ट्विटर आणि फेसबुकनंतर पुढचा नंबर कोणाचा? असाही प्रश्न पाटील यांनी विचारला आहे.

केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीविरुद्धच्या धोरणाला या सामाजिक माध्यमांतून तीव्र विरोध झाल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button