दिवाळी जेलमध्ये होणार का ? : टोलविरोधी आंदोलकांचा संतप्त सवाल

Toll

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील टोल विरुद्ध आंदोलन पाच वर्ष कोल्हापुरात सुरू होते. यामध्ये अनेक सामाजिक कार्यकर्त्यांच्या वर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. याबाबत न्यायालयामध्ये खटले सुरू आहेत, असे असताना शासन मात्र नुकसान भरपाईच्या नोटिसा आंदोलकांना पाठवत आहेत. दिवाळी जेलमध्ये होणार का ? असा टोलविरोधी आंदोलक सवाल उपस्थित करत आहेत.

वेळो वेळी सत्तेतल्या मंत्र्यानी सर्व गुन्हे मागे घेतले जातील अशी फक्त आणि फक्त आश्वासने दिली. सन 2011 पासून आज अखेर कोणत्याही केसेसचा निकाल लागलेला नाही. अथवा कोणत्याही कार्यकर्त्याला मान्य कोर्टाने दोषी ठरवलेलं नाही, जोपर्यंत माननीय कोर्ट दोषी ठरवत नाही, तोपर्यंत शासनाने काढलेल्या नोटीसच्या अनुषंगाने दंड भरण्याचा प्रश्नच उदभवत नाही, असे टोल विरोधी कृती समितीचे दिलीप देसाई यांनी पत्रकाद्वारे म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER